रोम ते हॉलिवूड..! जाणून घ्‍या व्‍यक्‍तिमत्त्‍व देखणं करणार्‍या 'सनग्लासेस'चा इतिहास...

Sunglasses History | डोळ्यांच्या संरक्षणाबरोबरच व्यक्‍तिमत्‍वाचीही ठरते ओळख
Sunglasses History
सनग्‍लासेस ही हॉलिवूड सेलीब्रेटींची ओळख बनली आहे.( Image Source X )
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : सनग्लासेस म्‍हटलं की, तुम्‍हाला काय आठवतं? गाॅगल घातलेला रुबाबदार हिराे ते हवेत गाॅगल भिरकावणारा दाक्षिणात्‍य सुपरस्‍टार रजनीकांत. याची आठवण येणाचं कारण म्‍हणजे फेब्रुवारीच्‍या मध्‍यालाच उन्‍हाच्‍या झळा तीव्र हाेवू लागल्‍या आहेत. उन्हात बाहेर पडताना गॉगलची गरज जाणवू लागली आहे. आज असंख्य प्रकारचे गॉगल्स बाजारात उपलब्ध आहेत. स्टाईल स्टेटमेंट म्हणूनही याचा वापर होतो. प्लास्टिकपासून काचेपर्यंत यामध्ये विविध प्रकार, आकार पाहायला मिळतात; पण तुम्‍हाला माहित आहे का, याच सनग्लासेस किंवा गॉगल्सना हजारो वर्षाचा इतिहास आहे.जाणून घेवूया याविषयी...

हिमालयात ट्रेकिंग करणारे वेगवेगळया उपयोगासाठी सनग्लास उपयुक्त ठरतो. डोळयांचे संरक्षण हा एक भाग झाला पण डार्क किंवा वेगवेगळया कलर्सचे सनग्लासेस फॅशन अ‍ॅक्सेससरीज म्हणून वापरले जातात. तसचे स्वतःची वेगळी ओळख म्हणूनही काहीजण सनग्लासेसचा वापर करतात. यामध्ये रेक्टँगल, हार्ट शेपचे गॉगल असे असंख्य प्रकार आहेत. असे वृत्त 'सीएनएन'ने दिले आहे.

रोमन सम्राट निरोनेही घातले होते सनग्‍लासेस

सनग्लासेस अगदी रोम काळातही याचा उपयोग होत असे. रोमचा सम्राट निरो हा ग्लॅडिएटरची फाइट पाहताना पॉलिश केलेले जेमस्टोन डोळयावर घालत असे. डोळ्यांचे सूर्यप्रकाशापासून संरक्षण करण्यासाठी तो असे करत असे. बर्फाळ प्रदेशात पूर्वीचे कॅनेडिअन लोक स्नो गॉगल्स वापरत असत. हे गॉगल्स तयार करण्यासाठी ते हरणांच्या शिंगापासून किंवा व्हेल माशांच्या हाडाचा वापर करत असत. आडव्या पातळ पट्टी व त्याला मधोमध एक भोक अशाप्रकारचे हे गॉगल्स असत. शिकारीच्या वेळी बर्फाळ हवे पासून वाचण्यासाठी याचा चांगला उपयोग होत असे. पट्टीच्या मध्ये असलेल्या अगदी लहान आकाराच्या भोकातून शिकारीवर फोकस करणे सोपे पडत असे.

१९२१ मधील कॅनडाच्या उत्तर भागातील एका शिकर्‍याचे छायाचित्र. त्‍याने डोळ्यांवर लाकडांपासून बनवलेला स्‍नो ग्‍लासेस घातला आहे
१९२१ मधील कॅनडाच्या उत्तर भागातील एका शिकर्‍याचे छायाचित्र. त्‍याने डोळ्यांवर लाकडांपासून बनवलेला स्‍नो ग्‍लासेस घातला आहे( Image Source CNN )

12 व्या शतकात चिनमधील न्यायाधीशांकडूनही वापर

12 व्या शतकात चिनमधे न्यायाधीश गॉगल्स वापरत. हे गॉगल्स धुरकटं रंगाच्या काचमणींपासून तयार केलेले असत. याचा उपयोग न्यायनिवाडा करताना होत असे. यातून चेहर्‍यावरील हावभाव लपवले जात, न्याय देताना पक्षपातीपणा केला असे वाटू नये यासाठी किंवा त्यांच्या खरेपणावर कोणीही आक्षेप घेऊ नये यासाठी याचा उपयोग होत असे.

१९७० मधील हिरव्या काचा असलेले सनग्‍लासेस.
१९७० मधील हिरव्या काचा असलेले सनग्‍लासेस.( Image Source CNN )

आधुनिक जगातले सनग्‍लास इटलितील व्हेनिसमध्ये

इटलीत व्हेनिस शहरात आजकाल वापरले जाणारे सनग्लासेस पहिल्‍यांदा तयार हाऊ लागले. याठिकाणी काचकाम चांगल्या पद्धतीने होत असे. यामध्ये मुरनो आयलँडवर विषेशतः सनग्लासेसचे उत्पादन होत असे. 18 व्या शतकात व्हेनिसमधील महिला हिरव्या काचा असलेले गॉगल्स वापरत असतं. याचे डिझायन छोट्या गोल आकाराच्या आरशासारखे असत. यांना व्हेट्री दा गोडोंला किंवा दा दामा असे संबोधले जात असे.

चित्रपटांमुळे खर्‍या अर्थाने सनग्लासेसचा प्रसार

जेव्हा 20 व्या शतकात चित्रपट कलेचा प्रसार हाऊ लागला तसे गॉगल्सचा वापर वाढू लागला. हॉलिवूडमधील चित्रपट कलाकार स्टूडिओत चित्रीकरण करत असताना, तेथील प्रखर प्रकाशझोतांपासून डोळ्यांचे संरक्षण व्हावे यासाठी गॉगल्स वापरु लागले. त्याचप्रमाणे बाहेर चित्रीकरणावेळीही कलाकार वेगवेगळया प्रकारच्या रंगछटा असलेले गॉगल्स वापरु लागले. हेच हॉलिवूड कलाकार स्टार झाल्यानंतर गॉगल्स ही त्यांची ओळख बनली. सार्वजनिक ठिकाणी गेल्यानंतर खासगीपण जपण्यासाठी याचा वापर होतो. त्यांच्या प्रभावामूळे गॉगल्सचा वापर सामान्य जनतेत सरार्स होऊ लागला. ग्रेटा गार्बो, अ‍ॅड्रु हेपबर्न यासारखे हॉलिवूड सेलिब्रीटी त्यांच्या गॉगलच्या वापरामुळेही प्रसिद्ध होते.

हॉलिवूड कलाकारांसाठी गॉगल्‍स हे स्‍टाईल स्‍टेटमंट असतात.
हॉलिवूड कलाकारांसाठी गॉगल्‍स हे स्‍टाईल स्‍टेटमंट असतात.( Image Source X )

आधुनिक काळातील गॉगल्स

आधुनिक काळातील अ‍ॅन्टी ग्लेर ग्लासेस (प्रखर प्रकाशापसून वाचवणारे ) व अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून (अतिनील किरणे) डोळयांचे रक्षण करणारे गॉगग्लस अ‍ॅव्हिएटर रे बॅन कंपंनीने 1939 साली युएस आर्मीसाठी बनवले. आजही एव्हिएटर गॉगल्स आयकॉनिक आहेत. अनेकांसाठी ते सिग्नचर स्टाइल ठरतात. खाकी वर्दीवर असे गॉगल्स पोलिस, सैनिकांचे व्यक्तिमत्व प्रभावी बनवतात. तर 1920 पासून ड्रार्क ग्लासेसची लोकप्रियता वाढली. याचबरोबर 1960-70 च्या दशकात महिलांमध्ये गॉगल्सची लोकप्रियता वाढली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news