Hezbollah attacked the Israeli city of Haifa
हिजबुल्लाने इस्रायलच्या हैफा शहरावर हल्ला केला.File Photo

इस्रायलच्या हैफावर ‘हिजबुल्ला’चा हल्ला

10 जखमी; हिजबुल्ला प्लाटून कमांडर ठार
Published on

तेल अवीव/बैरुत; वृत्तसंस्था : हिजबुल्लाने इस्रायलच्या हैफा शहरावर हल्ला केला. त्यात किमान 10 जण जखमी झाले. सर्व जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुसरीकडे इस्रायलच्या हल्ल्यात हिजबुल्लाचा प्लाटून कमांडर हॅचर अली ताविल मारला गेला. जानेवारीमध्ये इस्रायलवर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याचा तो मास्टरमाईंड होता, या हल्ल्यात 2 लोक मरण पावले होते, तर अनेक जखमी झाले होते.

हिजबुल्लाने इस्रायलच्या कार्मेल लष्करी तळालाही लक्ष्य केले. हिजबुल्लाने लेबनॉनमधून 120 हून अधिक रॉकेट इस्रायलवर डागले. लेबनॉन सीमेवर हिजबुल्लाशी चकमकीत एक इस्रायली सैनिक मरण पावला, दोन सैनिक जखमी झाले आहेत. मास्टर सार्जंट एटे अझुले (वय 25) असे इस्रायलच्या मृत सैनिकाचे नाव आहे.

अमेरिकेकडून दीड लाख कोटी

अमेरिकेने इस्रायलला वर्षभरात किमान 17.9 अब्ज डॉलरची (1.5 लाख कोटी रुपये) लष्करी मदत दिली आहे. ब्राऊन युनिव्हर्सिटीच्या कॉस्टस् ऑफ वॉर प्रोजेक्टच्या अहवालात ही माहिती नमूद आहे.

नोव्हा फेस्टिव्हलस्थळी गर्दी

गतवर्षी 7 ऑक्टोबरलाच हमासच्या दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्या लोकांच्या स्मरणार्थ सीमेला लागून असलेल्या किबुत्झ रीम येथे लोक जमले होते.

कराचीत निदर्शने

गाझावरील इस्रायलच्या हल्ल्याला एक वर्ष पूर्ण होण्याच्या पूर्वसंध्येला हजारो लोकांनी कराचीत (पाकिस्तान) निदर्शने केली.

संघर्षाचे वर्ष पूर्ण

हमासने गतवर्षी 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हल्ला केला होता. सोमवारी त्याला वर्ष पूर्ण झाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news