कट रचून हसीना यांना केले पायउतार

मोहम्मद युनूस यांची कबुली; लवकरच बांगला देशचे नवे रूप पाहायला मिळेल
Sheikh Hasina resignation plot
कट रचून हसीना यांना केले पायउतार. Pudhari File Photo
Published on
Updated on

ढाका : बांगला देशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना सत्तेवरून पायउतार करण्यासाठी कट रचला असल्याची कबुली देशाच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी दिली आहे. अमेरिकेतील क्लिटंन ग्लोबल इनिशिएटिव्हच्या सभेला संबोधित करताना युनूस यांनी बांगला देशातील विद्यार्थी नेत्यांचे कौतुक करत आता जगाला लवकरच बांगला देशचे नवीन रूप पाहायला मिळेल, असे म्हटले आहे.

ते म्हणाले की, बांगला देशात करण्यात आलेले विद्यार्थ्यांचे आंदोलन खूपच सुनियोजित होते. या आंदोलनात कोणालाही एकाकडे नेतृत्व दिले नव्हते, अथवा कोणालाही अटक करण्यात आली नव्हती. यामुळे संपूर्ण देशातील तरुणांना प्रेरणा मिळाली आणि ही चळवळ आणखीनच शक्तिशाली बनली. माझा सहायक महफूज आलम आणि हसीना यांना हटवण्यास जबाबदार होतो. जर तुम्ही या विद्यार्थी नेत्यांचे चेहरे पाहिले तर ते सामान्य तरुणांसारखे दिसतील. पण, जेव्हा ते बोलू लागतात त्यांना तुम्ही थरथरून घाबरून जाल. त्यांनी आपल्या भाषणाने आणि समर्पणाने संपूर्ण देशाला हादरवून सोडले. या बांगला देशातील संपूर्ण आंदोलनामागे महफूज याचा मेंदू होता. पण, तो हे सातत्याने नाकारत असतो. पण, त्यामुळेच त्याला एक स्वतंत्र ओळख मिळाली. ही चळवळ अचानक सुरू झालेली नाही. या चळवळीचे नेतृत्वही पूर्ण नियोजनबद्ध करण्यात आले होते. यानंतर युनूस यांनी सर्व विद्यार्थी नेत्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 8 ऑगस्ट रोजी बांगला देशात अंतरिम सरकार स्थापन करण्यात आले. नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनूस यांना या सरकारचे मुख्य सल्लागार करण्यात आले होते.

विद्यार्थी शौर्याने लढले

शेख हसीना यांच्या सरकारने आंदोलनावेळी विद्यार्थ्यांवर गोळीबार करण्यात आला. तरी हे विद्यार्थी शौर्याने लढले. आंदोलन बांगला देशात इतके तीव्र बनले की हसीना यांना राजीनामा देण्याशिवाय पर्यायच राहिला नसल्याचे यावेळी युनूस म्हणाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news