

पुढारी ऑनलाईन डेस्क : इस्त्रायल हमासमध्ये संर्घष विराम झाल्यानंतर दोन्हीकडील बाजूंनी ओलिसांची हळू हळू सुटका केली जात आहे. आज शनिवार ८ फेब्रुवारी रोजी हमासने त्यांच्या ताब्यात असलेल्या ३ इस्त्रायली नागरिकांची सुटका केली. एली शराबी, ओहद बेन अमी, आणि लेवी अशा या सुटका केलेल्या नागरिकांची नावे आहेत.
या ओलिसांना हमासने रेडक्रॉस संघटनेकडे सोपविले आहे. आता यांना गाझापट्टीतून इस्त्रायला घेऊन जाणार आहेत. हे नागरिक खूपच अशक्त व आजारी असल्याचे प्रसिद्ध झालेल्या छायाचित्रातून दिसत आहे.
आता या तीन बंधकांना मुक्त केल्यानंतर १८३ पॅलेस्टिनी बंधकांना इस्त्रायल मुक्त करणार आहे. इस्त्रायल व हमास मध्ये १९ जानेवारीला शस्त्रबंदी झाली आहे. तेव्हापासून आतापर्यंत दोन्ही बाजूंकडून पाचवी अदलाबदली झाली आहे. यामध्ये १६ इस्त्रायली तर ५ थाई बंधकांची सुटका झाली आहे.
७ ऑक्टोबर २०२३ मध्ये हमास संघटनेने इस्त्रायलवर हमला केला होता. यावेळी त्यांनी १२०० लोकांनी ओलिस ठेवले होते. यानंतर इस्त्रायचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी हमासविरोधात युद्ध छेडले होते.