माद्रीद : पुढारी ऑनलाईन
बहुतेक वेळा रक्ताच्या नात्यांपेक्षा विनारक्ताची माणसं खूप साथ देतात, अशा माणसांमध्ये पहिला उल्लेख होतो आपल्या मित्राचा. नावाला मित्र संबोधणारे खूप जण असतात; पण सच्चा मित्र कसा असतो ते 'या' व्हायरल टिकटाॅक व्हिडीओतून पाहायला मिळतं. हा व्हिडीओ पाहताना तुम्ही पहिल्यांदा आश्चर्यचकीत व्हाल, नंतर तो मित्र असा का करतो, याचं कारण समजलं तर तुम्ही भावनिकसुद्धा व्हाल.
वाचा ः 'फुलाला सुगंध मातीचा' फेम कीर्ती रिअलमध्ये दिसते सुंदर
हा व्हिडीओ स्पेनमधील आहे. बार्बर जोएल ओर्टेग हा आपल्या मित्राचे म्हणजेच नेफताली मार्टिनचे केस कापत आहे. पण, हे केस कापत असताना बार्बर स्वतःच्या डोक्यावरही केस कापण्याची मशीन फिरवतो. ते पाहून उदास असणाऱ्या मार्टिनला रडू आवरत नाही. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत त्याचं कारण स्पष्ट केलंय.
वाचा ः 'मानापमान' आता रुपेरी पडद्यावर
हा व्हिडीओ पोस्ट मागील कारण असं आहे की, मित्र नेफताली मार्टिनला कॅन्सर असल्यामुळे त्याचे केस गळत आहेत. आपल्याला झालेला कॅन्सर पाहून मार्टिन दुःखी आहे. दुकानात केस कापताना तो गंभीर असतो. मित्राला झालेला कॅन्सर आणि त्याची अवस्था पाहून बार्बरला कल्पना करवत नाही. तो चक्क मार्टिनचे केस कापत असताना तेच केस कापण्याचे मशीन स्वतःच्या डोक्यावरून फिरवत राहतो. या कृतीतून तो आपल्या जिवलग मित्र मार्टिन सांगू इच्छित आहे की, मित्रा, तू कॅन्सरसारख्या भयानक आजाराशी लढतो आहे. या लढाईत आम्ही तुझ्याबरोबर आहे.
वाचा ः मलायकाच्या हातातील अंगठीवरुन चर्चेला उधाण
कॅन्सरग्रस्त नेफताली मार्टिनने मोठ्या भावनिकपणे पोस्ट करत इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात त्याने लिहिलं आहे की, 'तू एकटा नाहीस', हे शब्द माझ्या जिवलग मित्राचे आहेत.