Qatar energy minister warns | इराण संघर्ष तीव्र झाल्यास आखाती देशांकडून इंधन निर्यात बंद होणार!

कतारचे ऊर्जा मंत्री साद अल-काबी इशारा
Qatar energy minister warns |
Qatar energy minister warns | इराण संघर्ष तीव्र झाल्यास आखाती देशांकडून इंधन निर्यात बंद होणार!
Published on
Updated on

दोहा; वृत्तसंस्था : इराणमधील युद्धस्थिती आणखी काही आठवडे कायम राहिल्यास आखाती प्रदेशातील सर्व ऊर्जा उत्पादक देशांना तेल आणि गॅस निर्यात थांबवावी लागू शकते, असा इशारा कतारचे ऊर्जा मंत्री साद अल-काबी यांनी दिला आहे.

इराणवर अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्यांच्या प्रत्युत्तरात इराणने आखाती देशांवर क्षेपणास्त्र व ड्रोन हल्ले सुरू केले आहेत. या पार्श्वभूमीवर कतारने सोमवारी आपल्या द्रवीकृत नैसर्गिक वायू उत्पादनावर तात्पुरती स्थगिती दिली आहे. कतारचे उत्पादन जगातील एकूण पुरवठ्याच्या सुमारे 20 टक्के आहे. त्यामुळे आशिया आणि युरोपमधील ऊर्जा बाजार संतुलित ठेवण्यात कतारची मोठी भूमिका आहे. परंतु संघर्ष सुरू राहिल्यास या पुरवठ्यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

साद अल-काबी यांनी सांगितले की, सध्या अनेक ऊर्जा कंपन्यांनी फोर्स मॅज्यूर (आपत्कालीन कारणास्तव करार पाळता न येणे) घोषित केलेले नाही. परंतु युद्ध असेच सुरू राहिले तर पुढील काही दिवसांत सर्व निर्यातदारांना तसे करावे लागेल. युद्ध तत्काळ थांबले तरी कतारला पुन्हा नियमित पुरवठा सुरू करण्यासाठी काही आठवडे ते काही महिने लागू शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, अनेक अर्थतज्ज्ञ आणि विश्लेषकांनी इराण संघर्षामुळे तेलाचे दर प्रति बॅरल 150 डॉलरपर्यंत जाऊ शकतात, असा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे जागतिक ऊर्जा बाजार आणि अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे.

जागतिक अर्थव्यवस्थेला फटका

युद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवरही मोठा परिणाम होऊ शकतो. जर हा संघर्ष काही आठवडे चालू राहिला, तर जगभरातील उत्पादन वाढीवर परिणाम होईल. ऊर्जा दर मोठ्या प्रमाणात वाढतील, काही उत्पादनांची कमतरता निर्माण होईल आणि कारखान्यांच्या पुरवठा साखळीवरही परिणाम होईल, असे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news