

Greenland and Donald Trump सध्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चर्चेत आहेत ते म्हणजे व्हेनेजुएला वर केलेला कब्जा व आता ग्रीनलँड या बेटावर दावा करत असल्याने, व्हेनेजूएला वर थेट लष्करी कारवाई करत त्यानी अध्यक्ष निकोलस मादुरो यांना बंदी बनवून अमेरिकेत आणले यामुळे जगाला धास्ती आहे की आता ते ग्रीनलँडवर कब्जा करतील. यामुळे जगात सर्वत्र भितीचे वातावरण करत आहे. यावरुन डेन्मार्कचे खासदार आणि युरोपीय संसदेचे सदस्य अँडर्स व्हिस्टिसन (Anders Vistisen) यांनी ट्रम्प थेट संसदेतच शिवी हासडली आहे. संसदेत बोलताना ट्रम्प यांना "F* Off"** अशी थेट शिवीच दिली आहे.
ट्रम्प यांनी ग्रीनलँड (Greenland) हा भूभाग डेन्मार्ककडून खरेदी करण्याची इच्छा पुन्हा एकदा व्यक्त केल्यानंतर, युरोपीय राजकारणात याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. डॅनिश खासदार आणि युरोपीय संसदेचे सदस्य (MEP) अँडर्स व्हिस्टिसन (Anders Vistisen) यांनी ट्रम्प यांच्या या मागणीचा कडाडून विरोध केला संसदेत त्यांनी आपल्या भाषणात ट्रम्प यांना फटकारले.
‘ग्रीनलँड हा गेल्या ८०० वर्षांपासून डेन्मार्कच्या राज्याचा अविभाज्य भाग आहे. तो आमचा देश आहे आणि तो विक्रीसाठी नाही. मिस्टर ट्रम्प, मी तुम्हाला अशा शब्दांत सांगतो जे तुम्हाला चांगले समजेल – 'F* Off'**!’असे शब्द व्हिस्टिसन यांनी उच्चारले.
ग्रीनलँडची सध्याची स्थिती काय, अमेरिकेचा का आहे डोळा
ग्रीनलँड हा नैसर्गिक संसाधने, दुर्मिळ खनिजे आणि युरेनियमचा मोठा साठा असलेला प्रदेश आहे. हवामान बदलामुळे येथील बर्फ वितळत असल्याने नवीन सागरी मार्ग आणि संसाधने उपलब्ध होत आहेत, ज्यावर अमेरिका, रशिया आणि चीनची नजर आहे.
तर चिन किंवा रशिया ग्रीनलँडवर कब्जा करतील
गेल्या काही महिन्यांपासून डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँड ताब्यात घेण्याची भाषा सुरु केली आहे. याला अनेक युरोपियन राष्ट्रांचा विरोध आहे. तर ट्रम्प म्हणतात आम्ही नाही तर चिन किंवा रशिया हे देश ग्रीनलँडवर कब्जा करतील. अनेक वेळा ते थेट त्यांच्यावर आरोप करतात तर अमरिका हे ग्रीनलँडच्या जवळ असल्याने 'राष्ट्रीय सुरक्षा' आणि 'आर्क्टिक क्षेत्रातील सामरिक महत्त्व' असल्याचे सांगून ग्रीनलँडवर अमेरिकेचे नियंत्रण असणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.
काय आहे ग्रीनलँडचा इतिहास - महत्व
१५ व्या शतकात हवामान बदलामुळे येथे राहणाऱ्या स्थानिक वायकिंग्सच्या वस्त्या नष्ट झाल्या. त्यानंतर १७२१ मध्ये डॅनिश मिशनरी हान्स एगेडे याने पुन्हा या बेटाचा संपर्क उर्वरित जगाशी करून दिला. तेव्हापासून ग्रीनलँडवर डेन्मार्कचे नियंत्रण राहिले आहे. दरम्यान दुसऱ्या महायुद्धात जेव्हा जर्मनीने डेन्मार्कवर ताबा मिळवला, तेव्हा ग्रीनलँडच्या संरक्षणाची जबाबदारी अमेरिकेने घेतली. अमेरिकेने तिथे 'थुले एअर बेस' सारखे लष्करी तळ उभारले.
सध्या हवामान बदलामुळे ग्रीनलँडचा बर्फ वेगाने वितळत आहे, ज्यामुळे तिथली दुर्मिळ खनिजे आणि तेलाचे साठे उपलब्ध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याच कारणामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँड ताबा मिळवण्याची किंवा खरेदी करण्याची इच्छा वारंवार व्यक्त केली आहे, ज्याला डेन्मार्क आणि ग्रीनलँडच्या जनतेने तीव्र विरोध केला आहे.
दुसरीकडे ज्या युरोपीय देशांनी ग्रीनलँडच्या मुद्द्यावरून डेन्मार्कला पाठिंबा दिला आहे, त्यांच्यावर ट्रम्प यांनी आयात शुल्क (Tariffs) लावण्याची धमकी दिली आहे. सध्या अमेरिकेच्या वाढत्या दबावामुळे डेन्मार्कने खबरदारीचा उपाय म्हणून ग्रीनलँडमध्ये आपले सैनिक तैनात केले आहेत. युरोपीय देश मात्र डेन्मार्कच्या पाठीशी उभे ठाकले आहेत.