

सध्या सोशल मिडीयावर एक अरबांच्या लग्नातला एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक व्यक्ति हातामध्ये एक पेटी घेऊन ती लग्नाला आलेल्या पाहूण्यांच्या समोर धरत आहे. या पेटीत सोन्याची बिस्किटे ठेवलेली आहेत. यामध्ये प्रत्येक पाहूना एक बिस्कीट घेतो काहीजण नाकारतात तर एकजण दोन बिस्किटे घेतो.
हा व्हिडीओ पाहून प्रतिक्रीयांचा पाऊस पडला आहे. तसेच कालपासून खूप व्हायरल झाला आहे. यावर सौदी लग्नात पैशाचा वारेमाप वापर होतो. तसेच हे अरब श्रीमंत असतात, ल्रग्नात वर पक्षाल सोन्याची बिस्कीटे अशा कॅप्श्नने हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या ३३ सेकंदांच्या क्लिपमध्ये पाहुण्यांना चक्क २४ कॅरेट सोन्याची बिस्किटे भेट म्हणून दिली जात असल्याचा दावा केला मात्र, या व्हिडिओमागचे सत्य आता समोर आले आहे.
व्हिडीओ कोणी पोस्ट केला
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर @Rainmaker1973 या युजरने हा व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये एक व्यक्ती हातात चमकदार सोन्याच्या बिस्कीटांनी (Gold Bars) भरलेली पेटी घेऊन लग्नात बसलेल्या पाहुण्यांना ते वाटताना दिसत आहे. कॅप्शनमध्ये असा दावा करण्यात आला होता की, "सौदी अरेबियातील एका लग्नात वधूच्या भावाने वराच्या कुटुंबाला २४ कॅरेट सोन्याची बिस्किटे भेट दिली आहेत." काही तासांतच या व्हिडिओला ३.७ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले.
प्रतिक्रियांचा पाऊस
हा व्हिडिओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. काहींनी याला रॉयल पाहुणचार म्हटले, तर काहींनी याला निव्वळ श्रीमंतीचे प्रदर्शन म्हणत टीका केली. मात्र, व्हिडिओ काळजीपूर्वक पाहणाऱ्या नेटीझन्सनी या व्हिडीओमागचे सत्य शोधून काढले आहे.
सोन्याची बिस्कीटे की लक्झरी चॉकलेट
ज्याला लोक सोन्याची बिस्किटे समजत होते, ती प्रत्यक्षात सोन्याची बिस्किटे नसून लक्झरी चॉकलेट्स निघाली. ही मध्यपूर्वेतील प्रसिद्ध 'पॅची' (Patchi) या प्रीमियम चॉकलेट ब्रँडची ही चॉकलेट्स आहेत. ही चॉकलेट्स हुबेहूब सोन्याच्या बिस्कीटांसारख्या दिसणाऱ्या गोल्ड रॅपमध्ये गुंडाळलेली असतात. लाबून पाहिली की ही सोन्याची बिस्कीटेच वाटतात. तसेच अरब देशांमधील विवाहसोहळ्यांमध्ये अशा प्रकारची महागडी आणि सोन्याच्या रंगात सजवलेली चॉकलेट्स वाटण्याची मोठी परंपरा आहे.
यावर एका युजरने कमेंट करत लिहिले, "भावा, ही सोन्याची बिस्किटे नाहीत, तर सोन्याच्या फॉइलमध्ये गुंडाळलेली 'पॅची' चॉकलेट्स आहेत. दुसऱ्या एका युजरने स्पष्ट केले की, "या संपूर्ण पेटीची किंमत ५० डॉलर्सपेक्षाही कमी आहे.