AIचे गॉडफादर जेफ्री हिंटन यांना 'नोबेल'; AIबद्दल पुन्हा दिला 'हा' गंभीर इशारा

संशोधनाबद्दल पश्चाताप नाही, पण गोष्टी नियंत्रणाच्या पलीकडे जाऊ शकतात - हिंटन
Geoffrey Hinton
जेफ्री हिंटन काँप्युटर सायन्स आणि कॉग्निटिव्ह सायकॉलॉजी यात काम करतात.File Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचे (AI) गॉडफादर म्हणून ओळखले जाणारे संशोधक जेफ्री हिंटन यांना जॉफ हॉफफिल्ड यांच्या समवेत फिजिक्समधील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर रॉयल स्वीडिश अॅकडमी ऑफ फिजिक्सच्या सदस्यांशी त्यांनी कॉन्फरन्स कॉलवर संवाद साधला. यात हिंटन यांनी AIच्या गैरवापराबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

AIच्या गैरवापराबद्दल काळजी करावी लागेल - हिंटन

हिंटन कॅनडातील टोरंटो विद्यापीठातील संशोधक आहेत. AIची संरचना ही मानवी मेंदूच्या रचनेची कॉपी केलेली आहे. याला आर्टिफिशिअल न्यूरल नेटवर्क असे म्हटले जाते. यावर हिंटन यांनी मूलभूत संशोधन केलेले आहे.

ते म्हणाले, "मानवी उत्क्रांतीत जे महत्त्व औद्योगिक क्रांतीचे आहे, तसाच प्रभाव AIचा असेल. यामुळे मानवाच्या बौद्धिक क्षमतांचा विकास होईल. माणसाला त्याच्यापेक्षा बुद्धिमान असलेल्या गोष्टींसोबत काम करण्याचा अनुभव नाही. यामुळे आपली उत्पादकता वाढेल. पण आपल्याला याच्या गैरवापराबद्दलही काळजी करावी लागेल, गोष्टी आपल्या नियंत्रणाच्या बाहेरही जाऊ शकतात."

आरोग्यसेवा, संशोधन आणि हवामान बदलावर मात करण्यात AIची मदत होणार आहे, असे ते म्हणाले.

जेफ्री हिंटन कोण आहेत? Who is Geoffrey Hinton?

हिंटन काँप्युटर सायन्स आणि कॉग्निटिव्ह सायकॉलॉजी यात काम करतात. मशिन लर्निंग याचा पुढचा टप्पा म्हणजे AI होय. यामध्ये बॅकप्रोपगेशन या संकल्पनेला अनन्य साधारण महत्त्व आहे. यामुळे संगणकीय प्रणाली मिळणाऱ्या आउटपूटमधून स्वतःच शिकत जाते. या बॅकप्रोपागेशनचा शोध हिंटन यांनी लावला. तसेच न्यूरल नेटवर्कमध्ये मौलिक संशोधन गेले.

हिंटन सुरुवातीला अमेरिकेत संशोधन करत होते. पण AIचा वापर संरक्षण सिद्धतेत केला जाऊ नये, ही त्यांची भूमिका होती. त्यातून त्यांनी अमेरिका सोडत कॅनडात स्थायिक होणे पसंत केले. २०१२ला हिंटन आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी Alex Net ही प्रणाली विकसित केली होती. फोटो ओळखू शकणारी ही प्रणाली त्या वेळी उपलब्ध प्रणालींपेक्षा ४० टक्के अधिक अचूक होती.

Alex Net नंतर गुगलने विकत घेतले, त्याच वर्षी हिंटन गुगलमध्ये उपाध्यक्ष म्हणून रुजू झाले. २०२३मध्ये त्यांनी गुगलमधील नोकरीचा राजीनामा दिला. AIबद्दल खुलेपणाने मतं मांडता यावीत यासाठी त्यांनी ही भूमिका घेतली. "मी केलेल्या संशोधनाचा पश्चाताप नाही, पण दीर्घकाळाचा विचार केला तर AI अनियंत्रित होईल याची भीती वाटते," असे ते म्हणाले होते.

Geoffrey Hinton
Nobel Prize 2024 : फिजिक्समधील नोबेल पुरस्कार जॉन हॉपफिल्ड आणि जेफ्री हिंटन यांना जाहीर

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news