Giant Sinkhole in China |शाघांयमध्ये भररस्त्‍यात अचानक पडला 500 चौरस फूटाचा खड्डा : विजेचे खांब, रस्ताही गायब

मेट्रो प्रकल्पासाठी जमीनीची खुदाई झाल्यामुळे घडला प्रकार
Giant Sinkhole in China |शाघांयमध्ये भररस्त्‍यात अचानक पडला 500 चौरस फूटाचा खड्डा : विजेचे खांब, रस्ताही गायब
Published on
Updated on

चीनची आर्थिक राजधानी असलेल्या शांघाय शहरात काल एका रहदारीच्या रस्त्याचा मोठा भाग अचानक जमिनीच्या पोटात गडप झाला. ही घटना इतकी वेगाने घडली की पाहणाऱ्यांच्या अंगावर काटा आला. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. पण ही घटना घडताना कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाली आहे.

कूठे घडली घटना

ही घटना शांघायमधील मिन्हांग (Minhang) जिल्ह्यात असलेल्या किक्सिन रोड आणि लियान रोडच्या चौकात घडली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये असे दिसत आहे की, रस्त्यावर आधी लहान तडे गेले आणि काही सेकंदांतच सुमारे ५०० चौरस फुटांचा रस्ता खोल खड्ड्यात गेला. यात रस्त्यावरील विजेचे खांब, पदपथ आणि बाजूला असलेले बांधकामाचे साहित्य पूर्णपणे गायब झाले.

चिन सरकारने आता या घटनेची चौकशी सुरु केली आहे. यामध्ये मेट्रो लाईनसाठी जमीनीखाली खुदाई सुरु असल्यामुळे हा खड्डा पडला असल्याचे समोर आले आहे. या परिसरात 'जियामिन मेट्रो लाईन' साठी जमिनीखाली बोगद्याचे काम सुरू आहे. खुदाई दरम्यान पाण्याची पाईपलाईन फुटली परिणामी रस्त्‍याखाली सर्व माती वाहून गेली व वरचा रस्ता सरळ खड्डयात कोसळला.

शांघायमधील जमीन ही प्रामुख्याने नद्यांनी वाहून आणलेल्या गाळांनी बनली आहे. त्‍यामुळे कोणतीही खुदाई करताना अशा घटना घडण्याचा धोका असतो. आता या घटनेनंतर प्रशासानाने तात्‍काळ पावले उचलली असून या परिसरातील वाहतूक बंद केली असून आसपासच्या इमारतींमधील लोकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. मेट्रो रेल्वेचे काम तात्पुरते थांबवून हा खड्डा भरण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news