Germany Election | जर्मनीतील राज्यात जहाल उजव्या पक्षाचा विजय

पक्षाचा समलैंगिकतेला विरोध; मात्र पक्षप्रमुखच लेस्बियन
Germany Election 2026
Germany Election 2026 | जर्मनीतील राज्यात जहाल उजव्या पक्षाचा विजय
Published on
Updated on

बर्लिन; वृत्तसंस्था : जर्मनीच्या सॅक्सोनी-अनहाल्ट राज्यात सप्टेंबर २०२६ मधील निवडणुकीत ‘अल्टरनेटिव्ह फॉर जर्मनी’ (एएफडी) या उजव्या विचारसरणीच्या पक्षाने मोठे यश मिळवले. दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच जर्मनीतील एखाद्या राज्यात उजव्या विचारसरणीचा पक्ष सत्तेच्या इतका जवळ पोहोचला आहे.

२०२५ च्या जर्मनीतील फेडरल निवडणुकीत एएफडीला १५२ जागा मिळाल्या होत्या. आता सॅक्सोनी-अनहाल्टच्या राज्य निवडणुकीत ३९ जागा जिंकून पक्षाने राज्याच्या राजकारणात मोठी मुसंडी मारली आहे. हा पक्ष स्थलांतरितांविरोधातील कठोर भूमिका आणि समलैंगिक विवाहाला विरोध यासाठी ओळखला जातो. विशेष म्हणजे, पक्षाचे नेतृत्व करणाऱ्या अ‍ॅलिस व्हायडल स्वतः मात्र लेस्बियन आहेत. त्या महिला साथीदारासोबत राहत असून दोघीही आपल्या दोन मुलांचे संगोपन करतात.

आजोबा हिटलरच्या नाझी पक्षात

अ‍ॅलिस व्हायडल यांचे आजोबा हान्स व्हायडल हे हिटलरच्या नाझी पक्षाशी संबंधित होते. १९४१ मध्ये त्यांची नाझी अधिकृत वॉर्सा येथे लष्करी न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली होती. दुसऱ्या महायुद्धानंतर त्यांचे कुटुंब पश्चिम जर्मनीत स्थायिक झाले.

२०१३ मध्ये स्थापन झालेल्या एएफडीमध्ये व्हायडल सहभागी झाल्या. २०१६ मध्ये पक्षाने पहिला जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यामध्ये समलैंगिकता आणि लैंगिक विविधतेशी संबंधित शिक्षणालाही विरोध केला.

अर्थशास्त्राचे शिक्षण, चीनमध्ये वास्तव्य

व्हायडल यांनी अर्थशास्त्र आणि व्यवसायाचे शिक्षण घेतले आहे. अमेरिकेतील गोल्डमन सॅक्स कंपनीत त्या कार्यरत होत्या. त्या बँक ऑफ चायनामध्ये होत्या. तसेच पाच वर्षे चीनमध्ये वास्तव्यास असताना त्यांनी मँडरिन भाषा शिकली. २०११ मध्ये 'चीनची पेन्शन व्यवस्था' या विषयावर डॉक्टरेट केली. त्यानंतर त्या जर्मनीत परतल्या.

पक्षाचा प्रभाव वाढतोय...

सॅक्सोनी आणि थुरिंगिया राज्यांमध्ये पक्षाची पकड मजबूत आहे. सॅक्सोनी-अनहाल्टमधील सुमारे ४४ टक्के मतांचा विजय आहे. जर्मनीतील इतर पक्ष एएफडीसोबत आघाडीस तयार नसल्याने सरकार स्थापनेचे आव्हान आहे. पक्षाची लोकप्रियता वाढत राहिली आणि इतर पक्षांशी राजकीय समीकरणे बदलली, तर २०२९ मध्ये व्हायडल चान्सलरपदाच्या शर्यतीतील प्रमुख दावेदार ठरू शकतात.

लेस्बियन लग्‍न आणि दोन अपत्ये

२००७ मध्ये अ‍ॅलिस व्हायडल यांची सारा बोसार्ड यांच्याशी भेट झाली. सारा या स्वित्झर्लंडच्या चित्रपट निर्मात्या असून त्यांचा जन्म श्रीलंकेत झाला होता. व्हायडल थआणि सारा यांची मैत्री पुढे प्रेमसंबंधात बदलली. दोघी २००९ पासून एकत्र आहेत. स्वित्झर्लंडमध्ये त्या आपल्या दोन मुलांसह राहतात. त्यांनी स्पर्म डोनेशनच्या माध्यमातून दोन मुलांना जन्म दिला. मुलांच्या जैविक वडिलांची ओळख दोघींना माहिती आहे; पण ती सार्वजनिक करण्यात आलेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news