Germany shooting : जर्मनमधील 'युथ सेंटर'मध्ये गोळीबार; पाच जण ठार

'स्टाडे' शहरातील मध्‍यवर्ती परिसरात मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम, एक संशयित ताब्‍यात
Germany shooting
Germany shooting file photo
Published on
Updated on

Stade Germany youth center shooting : उत्तर जर्मनीतील 'स्टाडे' (Stade) शहरात सोमवारी झालेल्या गोळीबाराच्या घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला. या घटनेच्या संदर्भात एका संशयिताला ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांच्या हवाल्याने जर्मन वृत्तसंस्था 'डीपीए'ने (dpa) ही माहिती दिली. शहराच्या मध्यवर्ती भागाबाहेरील एका परिसरात पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवली जात आहे.

घटनास्थळी बचाव आणि सुरक्षा कार्य सुरू

ल्युनबर्ग (Lüneburg) पोलीस मुख्यालयाने 'एक्स' (X) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट करून नागरिकांना त्या परिसरापासून दूर राहण्याचे आवाहन केले. घटनास्थळी बचाव आणि सुरक्षा कार्य सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. गोळीबारामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही आणि या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Germany shooting
अमेरिका पुन्हा हादरली! जॉर्जियामधील शाळेत गोळीबार, ४ ठार, १४ वर्षीय मुलगा ताब्यात

'युथ सेंटर'मध्ये गोळीबार

स्थानिक प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, स्टाडे येथील एका 'युथ सेंटर'मध्ये (तरुण-तरुणींसाठीच्या केंद्रात) हा गोळीबार झाला. हॅम्बर्गच्या पश्चिमेस वसलेल्या या शहराची लोकसंख्या सुमारे ५०,००० आहे. काही प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, या घटनेत एकापेक्षा जास्त हल्लेखोर सहभागी असू शकतात; मात्र पोलिसांनी या दाव्यांना अद्याप दुजोरा दिलेला नाही.

image-fallback
अमेरिका : न्यू जर्सीत गोळीबार, एका पोलिसासह सहा ठार

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news