पुढारी ऑनलाईन डेस्क : बदल ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. काळानुसार पिढी बदलते. विचार करण्याची पद्धत आणि मानसिकतेमधील बदल होणे अपरिहार्य असतं. मागील काही दशकांमध्ये तंत्रज्ञानातील क्रांतीकारी बदलाने नव्या पिढीच्या विचारातही तितक्याच वेगाने बदल झाले आहेत. १९९० ते २०००च्या सुरुवातीच्या टप्प्यात जन्माला आलेली पिढीला जेन-झी (Gen Z) असे म्हटलं जाते. अत्याधुनिक तंत्रज्ञान सामग्री आणि इंटरनेटच्या प्रचाराबरोबर माेठी झालेली पिढी असे तिचे वैशिष्ट्य आहे. राेजगाराबाबत ही पिढी कसा विचार करते? यावर नुकतेच एक सर्वेक्षण झालं. जाणून घेवूया Gen Zच्या रोजगारविषयक मानसिकतेविषयी...
Gen Zचे वैशिष्ट्य म्हणजे अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि इंटरनेटच्या प्रचाराबरोबर ही पिढी मोठी झाली आहे. त्यामुळेच समान संधी बरोबर व्यावहारिक आणि आर्थिकदृष्ट्या वेगळा विचार करणारी ही पिढी आहे. नवीन कल्पना मांडणे, नव्या संधीला आधुनिक तंत्रज्ञानाची जाेड देणे या माध्यमातून स्वतःचे व्यवसाय सुरू करणे हे या पिढीला अधिक भावते. उद्योजक मानसिकता असलेले पिढी स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याच्या प्राधान्य देते असल्याचे Santander UK च्या सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे.
Santander UKने जेन-झी असणार्या दोन हजार युवकांचे मत जाणून घेतले. या सर्वेक्षणात असे आढळले की, बहुतांश तरुण हे पारंपरिक ९ ते ५ या कामांचा विचारतच करत नाहीत. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या तीन चतुर्थांश तरुणांनी स्वतःच बॉस होण्याची महत्त्वाकांक्षा आहे. या पिढीच्या ७७ टक्के तरुणाई आपण व्यवसायात यशस्वी होवू, असा विश्वास व्यक्त केला. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने व्यवसायात यशस्वी होणे शक्य असल्याचे ३९ टक्के तरुणाईला वाटते.
याबाबत Gener8 चे संस्थापक सॅम जोन्स यांनी म्हटलं आहे की, जेन-झी ही आतापर्यंतची सर्वात उद्योजक पिढी असल्याचे सिद्ध होत आहे. हा योगायोग नाही. जेन-झी मधील तरुणाईही मागील पिढ्यांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. ते डिजिटल युगात प्रौढ झाले आहेत. या पिढीला मिळलेली माहिती, वापरात असलेले साधने आणि जगातील सर्वच उत्कृष्टेचा अनुभव फक्त एका क्लिकवर असून, यातूनच या पिढीची राेजगाराविषयक मानसिकता बदलत आहे.
या सर्वेक्षण करणार्या Santander UK कंपनीचे सीईओ माईक रेग्नियर यांनी म्हटलं आहे की, "डिजिटल जाणकार असणार्या Gen Z कडे एक विलक्षण उद्योजकता आहे; परंतु तुम्हाला स्वतःहून यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेले गुण याला वयाचे बंधन नसते. उद्योजक म्हणजे उत्कटतेने केलेला विचार, कुतूहल आणि काहीतरी अर्थपूर्ण निर्माण करण्याची इच्छा आवश्यक असते. या वर्षी, Santander UK कंपनीने त्याच्या पुरस्कारांसाठी 850 हून अधिक व्यवसाय अर्ज केले आहेत, ज्यामध्ये दोन तृतीयांश अर्जदार Gen Z आहेत. टॉप 100 शॉर्टलिस्ट केलेले व्यवसाय हेल्थकेअर, सस्टेनेबिलिटी, AI आणि टेक यांसारख्या क्षेत्रांमधील आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.