China coal mine blast | चीनमध्ये कोळसा खाणीत गॅस स्फोट; 90 ठार, 123 जखमी

चीनमधील 17 वर्षांतील सर्वात मोठी दुर्घटना
China coal mine blast |
बीजिंग : मोठ्या प्रमाणावर रुग्णवाहिका खाणीजवळ तैनात करण्यात आल्या.
Published on
Updated on

बीजिंग; वृत्तसंस्था : उत्तर चीनमधील शानक्सी प्रांतात एका कोळसा खाणीत झालेल्या भीषण गॅस स्फोटात किमान 90 कामगारांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 17 वर्षांतील ही चीनमधील सर्वात मोठी खाण दुर्घटना मानली जात आहे. सिनुआ या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, किनयुआन काऊंटीमधील लियुशेन्यू कोळसा खाणीत शुक्रवारी संध्याकाळी 7.29 वाजता हा स्फोट झाला. दुर्घटना घडली तेव्हा खाणीच्या आत 247 कामगार जमिनीखाली काम करत होते.

अपघाताचे नेमके कारण अजून स्पष्ट झालेले नाही; मात्र खाणीतील कार्बन मोनॉक्साईड (अतिशय विषारी आणि गंधहीन वायू) सेन्सर ट्रिगर झाल्यानंतर स्थानिक प्रशासनाला याची माहिती मिळाली. एका जखमी कामगाराने सांगितले की, स्फोटानंतर अचानक धूर आणि गंधकाचा वास आला. त्यामुळे अनेक लोक गुदमरले.

* किमान 123 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, चार जणांची प्रकृती चिंताजनक आहे. 755 अपत्कालीन आणि वैद्यकीय कर्मचारी बचावकार्यात गुंतले आहेत.

* चीनच्या शानक्सी प्रांतातील कोळसा खाणीत झालेल्या गॅस स्फोटात 90 जणांचा मृत्यू झाला, तर 123 जण जखमी झाले.

* ही दुर्घटना शुक्रवारी संध्याकाळी घडली, ज्यावेळी जमिनीखाली 247 कामगार काम करत होते.

* राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी बचावकार्यात कोणतीही कसर न सोडण्याचे आणि सुरक्षेचे नियम कडक करण्याचे आदेश दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news