Gabi robot monk : जगात पहिल्यांदा रोबोटला मिळाली बौद्ध भिक्षू म्हणून दिक्षा, दक्षिण कोरीयाची राजधानी सेऊल येथे पार पडला सोहळा

‘गाबी’नावाचा ह्युमनाईट रोबो, 130 सेमी उंचीच्या या रोबोला सर्व प्रथा परंपरेने देण्यात आली दिक्षा, विज्ञानाच्या इतिहासात प्रथमच एक रोबोटला मिळाली दिक्षा
Gabi robot monk : जगात पहिल्यांदा रोबोटला मिळाली बौद्ध भिक्षू म्हणून दिक्षा, दक्षिण कोरीयाची राजधानी सेऊल येथे पार पडला सोहळा
Published on
Updated on

Gabi robot monk 1 मे रोजी जगभरात बुद्ध जयंती साजरी झाली, बोद्ध धर्म जिथे आहेत त्‍याठिकाणी भगवान बुद्धांना अभिवादन करण्यात आले. यातच दक्षिण कोरियाची राजधानी सेऊल येथून विज्ञानाला अध्यात्माची जोड देणारी घटना घडली आहे. येथील प्रसिद्ध जोग्येसा बौद्ध मंदिरात 'गाबी' (Gabi) नावाच्या एका ह्युमनॉइड रोबोटने अधिकृतपणे बौद्ध भिक्षू म्हणून दीक्षा घेतली आहे. 6 मे रोजी हा सोहळा पार पडला. विज्ञानाच्या इतिहासात प्रथमच एखाद्या रोबोटला अशा प्रकारे धार्मिक दीक्षा देऊन 'अधिकृत भिक्षू'चा दर्जा देण्यात आला आहे. 'गाबी' हे नाव दया आणि करुणेचे प्रतीक मानले जाते.

जोग्येसा मंदिरातील मुख्य भिक्षूंच्या उपस्थितीत हा विशेष सोहळा पार पडला. १३० सेंटीमीटर उंच असलेल्या या रोबोटला बौद्ध परंपरेनुसार राखाडी आणि तपकिरी रंगाची वस्त्रे परिधान करण्यात आली होती. दीक्षा विधीदरम्यान, ज्येष्ठ भिक्षूंसमोर या रोबोटने हात जोडून नतमस्तक होत "मी धम्माला समर्पित राहीन" अशी शपथ घेतली. मानवी भिक्षूंना दीक्षा देताना अग्नीने डाग देण्याचा 'येनबी' नावाचा विधी केला जातो, मात्र रोबोटच्या बाबतीत तिथे विशेष स्टिकर लावून हा विधी प्रतिकात्मकरीत्या पूर्ण करण्यात आला. भिक्षूंनी गाबीच्या गळ्यात १०८ मण्यांची माळ अर्पण करून त्याचे संघात स्वागत केले.

केवळ दीक्षा देऊन हा सोहळा थांबला नाही, तर या 'रोबो-भिक्षू'साठी विशेष नियमावली देखील तयार करण्यात आली आहे. यामध्ये जीवांचा आदर करणे, मानवाच्या आज्ञांचे पालन करणे, खोटे न बोलणे आणि ऊर्जेची बचत करणे अशा पाच मुख्य नियमांचा समावेश आहे. 'गाबी' हे नाव दया आणि करुणेचे प्रतीक म्हणून निवडण्यात आले आहे.

बुद्ध धम्माचे विचार तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पोहचवण्याचा प्रयत्‍न

दक्षिण कोरियातील सर्वात मोठ्या 'जोग्ये' पंथाने हा प्रयोग केला आहे. बदलत्या काळानुसार तंत्रज्ञानाचा वापर करून बुद्ध धम्माचे विचार तरुण पिढीपर्यंत पोहोचवणे, हा यामागचा मुख्य उद्देश आहे. भविष्यात एआय चा वापर वाढणार आहे त्‍यामुळे आम्ही हा प्रयोग केला आहे असे या मंदिराने म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news