नायजेरियात ४८ लोकांचा होरपळून मृत्यू; तेलाचा टँकर आणि ट्रकचा भीषण अपघात

नायजर राज्यातील उत्तर मध्य भागातील अगाई या परिसरातील घटना
Nigeria Accident
नायजेरियात तेल वाहतूक करणारा टँकर आणि ट्रकच्या अपघतात ४८ लोकांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : नायजेरियात तेल वाहतूक करणारा टँकर आणि ट्रकच्या अपघतात ४८ लोकांचा होरपळून मृत्यू झाला आहे. नायजेरियाच्या राष्ट्रीय आणीबाणी विभागाने ही माहिती दिली आहे. याशिवाय ट्रकमधील ५० गुरे ठार झाली आहेत.

हा अपघात नायजर राज्यातील उत्तर मध्य भागातील अगाई या परिसरात झाला. आणीबाणी विभागाचे प्रमुख अब्दुलाही बाबा अरब यांनी ही माहिती दिली आहे. मृतांची जास्त संख्या आणि मृतदेहांची स्थिती लक्षात घेत सामूहिक दफनविधी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

रेल्वेचे जाळे नसल्याने अपघात जास्त

नायजेरियात रेल्वेचे जाळे भक्कम नसल्याने, तेल आणि इतर तत्सम सामुग्रीची वाहतूक करण्यासाठी ट्रक आणि टँकर यांचा वापर केला जातो. त्यातून अपघात होण्याचे प्रमाण फार जास्त आहे. २०२०मध्ये तेल वाहतूक करणाऱ्या टँकरचे अपघात होण्याच्या १५३१ घटना नोंदवण्यात आल्या होत्या, यात ५३५ लोकांचा बळी गेला होता.

Nigeria Accident
कर्नाटकमध्ये भीषण अपघात; ६ ठार, २ गंभीर जखमी

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news