Emmanuel Macron| फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांना पत्नीने विमानातच लगावली कानशिलात? व्हायरल व्हिडिओमुळे चर्चांना उधाण

Emmanuel Macron|व्हिएतनाम दौऱ्यातील प्रकार; विमानातून रेड कार्पेटवर स्वागतासाठी उतरण्याआधीचा मॅक्रॉन दांपत्याचा ‘खटकेबाज’ व्हिडिओ व्हायरल
Emmanuel Macron with wife Brigitte
Emmanuel Macron with wife BrigittePudhari
Published on
Updated on

French President Macron wife Brigitte plane moment Hanoi arrival red carpet incident viral video

हनोई (व्हिएतनाम) : फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या व्हिएतनाम दौऱ्याची सुरुवात एका विचित्र आणि सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलेल्या प्रसंगाने झाली आहे.

एका व्हिडिओमध्ये त्यांच्या पत्नी ब्रिजिट मॅक्रॉन या इम्यॅन्युएल यांच्या चेहऱ्यावर रागाने हात फिरवून त्यांना बाजुला सारताना दिसताहेत.

हनोई येथे विमानातून रेड कार्पेटवर स्वागतासाठी उतरण्याच्या अगदी आधीचा हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आणि जगभरात व्हायरल झाला आहे. त्यामुळे जगभरातील नवरा-बायको या व्हिडिओची मजा घेत आहेत.

नेमकं काय घडलं?

व्हिडिओमध्ये राष्ट्रपती मॅक्रॉन विमानाच्या दरवाजाजवळ उभे दिसतात. त्यांच्या पत्नी ब्रिजिट अद्यापही विमानात आहेत. दोघेही विमानाच्या बाहेर पायऱ्यांवरून उतरणार आहेत.

तत्पुर्वी ते दोघं बोलत असतानाच ब्रिजिट मॅक्रॉन यांचा हात अचानक मॅक्रॉन यांच्या चेहऱ्यावरून रागाने फिरताना दिसतो. मॅक्रॉन यांच्या चेहऱ्यावर जणू धक्काच त्या देतात.

ज्यामुळे इम्यॅन्युएल थोडेसे अचंबित होतात. मात्र, काही क्षणांतच मॅक्रॉन हे समजून घेतात की दरवाजा उघडलेला आहे आणि कॅमेरा त्यांच्या दिशेने आहे. ते लगेच हसतात आणि उजव्या हाताने हात हलवतात, तर दुसऱ्या हाताने गेटजवळील हँडल पकडतात.

यानंतर राष्ट्राध्यक्ष आणि फ्रान्सच्या फर्स्ट वुमन अर्थात मॅक्रॉन यांच्या पत्नी ब्रिजिट दोघेही विमानातून खाली येताना दिसतात.

Emmanuel Macron with wife Brigitte
Pakistan drone purchase: पाकिस्तानने चीनकडून खरेदी केले 30 किलर ड्रोन्स आणि लाँचर्स; PoK मध्ये ड्रोन तैनात करण्याची तयारी

पती-पत्नीमध्ये धुसफूस?

दरम्यान, विमानाच्या पायऱ्यांवरून रेडकार्पेटवर उतरताना मॅक्रॉन यांनी आपल्या पत्नीला सोबत घेऊन चालण्यासाठी हात किंवा कोपरा धरायला देण्यासाठी हात पुढे केला, पण ब्रिजिट मॅक्रॉन यांनी तो स्वीकारला नाही आणि त्या शिडीवरील रेलिंग पकडून खाली उतरल्या.

हा संपूर्ण प्रसंग एका एसोसिएटेड प्रेसच्या व्हिडिओ पत्रकाराने शूट केला होता.

व्हायरल व्हिडिओ आणि प्रतिक्रिया

हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. नेटीझन्सनकडून या व्हिडिओवर कॉमेंट्सचा वर्षाव झाला आहे.

काहींनी या कृतीचे "थापटले", "झटका दिला" अशा प्रकारे वर्णन केलं. नवरा-बायको सगळीकडे सारखेच, सगळीकडे सेमच अशा अर्थाच्या भन्नाट प्रतिक्रिया व्यक्त झाल्या आहेत.

दरम्यान, पहिली प्रतिक्रिया देताना फ्रेंच राष्ट्राध्यक्ष कार्यालयाने हा व्हिडिओ खोटा असल्याचे सांगितले होते, पण लवकरच त्याची खरी माहिती समोर आली.

Emmanuel Macron with wife Brigitte
Jyoti Malhotra Case | ज्योतीकडे अशी कोणती माहिती होती? पाकच्या रस्त्यावर बंदुकधारी तरुणांच्या गराड्यात फिरतानाचा व्हिडिओ समोर

काय म्हणाले राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन?

पत्रकारांनी हनोईमध्ये या घटनेबद्दल विचारले असता मॅक्रॉन म्हणाले, "आम्ही नेहमीप्रमाणे थट्टामस्करी करत होतो."

राष्ट्राध्यक्षांच्या जवळच्या सूत्रांनी या घटनेचं महत्त्व कमी करताना ती घटना म्हणजे "एका दांपत्यातील साधी आणि निरुपद्रवी खटपट" होती, असे म्हटले आहे.

तर आणखी एक फ्रेंच अधिकारी म्हणाले की, "तो दौऱ्याच्या आधीचा पती-पत्नीतील एक हलकाफुलका क्षण होता, त्यातून फार काही अर्थ काढण्याची गरज नाही."

दरम्यान राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांचा हा दौरा सात दिवसांचा असून, व्हिएतनामनंतर ते इंडोनेशिया आणि सिंगापूरलाही भेट देणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news