पुढारी ऑनलाईन डेस्क :ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकी गोलंदाज स्टुअर्ट मॅकगिल याला आज (दि. १३) कोकेन तस्करीत ( cocaine case) सहभागी असल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले; परंतु मोठ्या प्रमाणात ड्रग्ज पुरवठ्यात सहभागी असल्याबद्दल त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
एप्रिल २०२१ मध्ये सिडनी जिल्हा न्यायालयाच्या ज्युरीने ५४ वर्षीय लेग-स्पिनरला ३,३०,००० ऑस्ट्रेलियन डॉलर्समध्ये एक किलो कोकेन व्यवहार केल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्त केले. तथापि, त्याला ड्रग्ज पुरवठ्यात सहभागी झाल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवण्यात आले आहे.
ऑस्ट्रेलियन माध्यमांमधील वृत्तानुसार, मॅकगिल याला ड्रग्ज विक्रेता मेहुणा मारिनो सोटिरोपोलोससह सिडनीच्या उत्तर किनाऱ्यावरील त्याच्या रेस्टॉरंटमध्ये अटक झाली हाेती. सरकारी वकिलांनी असा युक्तिवाद केला की त्यांच्या सहभागाशिवाय हा व्यवहार होऊ शकला नसता. मॅकगिल याला आज (दि. १३) कोकेन तस्करीत (सहभागी असल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले; परंतु मोठ्या प्रमाणात ड्रग्ज पुरवठ्यात सहभागी असल्याबद्दल त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. आता शिक्षेची सुनावणी आठ आठवड्यांनंतर हाेणार आहे. स्टुअर्ट मॅकगिलला यानेऑस्ट्रेलियासाठी ४४ कसोटी सामने खेळले आहेत.