Nidal Hassan | अमेरिकेत मृत्युदंडाचे प्रथमच थेट प्रक्षेपण

फोर्ट हुड हल्ल्यातील दोषी निदाल हसनला ३ डिसेंबरला गोळ्या घालून मृत्युदंड
Nidal Hassan |
Nidal Hassan | अमेरिकेत मृत्युदंडाचे प्रथमच थेट प्रक्षेपण
Published on: 
Updated on: 

वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच मृत्युदंडाच्या शिक्षेचे थेट प्रक्षेपण केले जाणार असल्याची माहिती पेंटागॉनने दिली आहे. २००९ मध्ये टेक्सासमधील फोर्ट हुड लष्करी तळावर गोळीबार करून १३ जणांची हत्या करणाऱ्या माजी लष्करी मानसोपचार तज्ज्ञ निदाल हसन याला ३ डिसेंबर रोजी गोळीबार पथकाद्वारे मृत्युदंड दिला जाणार आहे. ही शिक्षा त्याच लष्करी तळावर अमलात आणण्याचे नियोजन आहे. मात्र, प्रक्षेपणाच्या स्वरूपाबाबत सविस्तर माहिती नंतर जाहीर केली जाणार आहे. रॉयटर्सने याबाबतचे वृत्त दिले आहे.

अमेरिकेचे संरक्षणमंत्री पीट हेगसेथ यांनीही समाजमाध्यमांवरील पोस्टद्वारे थेट प्रक्षेपणाच्या योजनेला दुजोरा दिला. त्यांच्या मते, अशा गुन्ह्यांचे गंभीर परिणाम लोकांना समजले पाहिजेत. २००९ मधील हल्ल्याच्या दिवशी, त्याच वेळेच्या आसपास आणि त्याच ठिकाणी शिक्षा देण्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले.

५ नोव्हेंबर २००९ रोजी निदाल हसनने फोर्ट हुड येथील वैद्यकीय केंद्रात लेझरयुक्त पिस्तुलातून गोळीबार केला होता. या हल्ल्यात १३ जणांचा मृत्यू झाला, तर अनेकजण जखमी झाले. अटकेदरम्यान पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तो जखमी झाला आणि त्याला अंशतः पक्षाघात झाला. ऑगस्ट २०१३ मध्ये लष्करी न्यायालयाने त्याला पूर्वनियोजित हत्या आणि हत्येच्या प्रयत्नांच्या एकूण ४५ आरोपांमध्ये दोषी ठरवून मृत्युदंड सुनावला.

थेट प्रक्षेपणावरून वादाची शक्यता

अमेरिकेत यापूर्वी न्यायालयीन निर्णयांमुळे मृत्युदंडाचे दूरचित्रवाणीवर प्रक्षेपण करण्याचे प्रयत्न रोखण्यात आले आहेत. तज्ज्ञांच्या मते, कायदेशीर शिक्षेचे थेट प्रक्षेपण करण्याची ही अभूतपूर्व घटना ठरू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news