

aaj tak
पुढारी ऑनलाईन डेस्क - माझा टी-शर्ट सोड, मम्मा रागावणार... पिंजऱ्यातील बंद वाघाला विनंती करत असतानाचा एका लहान मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिला असेल. अनेक लोक त्याला भारतातील एक प्राणीसंग्रहालय म्हणत आहेत. जिथे काही सोशल मीडिया युजर्स व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्ती विरोधात नाराजी व्यक्त करत आहेत. त्या मुलाची मदद करण्याऐवजी रील बनवणे अधिक गरजेचे आहे का? असे म्हणत आहेत तर काहींनी अशा असंवेदनशील व्यक्ती विरोधात एफआयआर दाखल करायला हवा, असे म्हटले आहे.
'आज तक'च्या फॅक्ट चेकमध्ये असे आढळले की, हा व्हिडिओ एडिटेड नाही तसेच भारतातीलही नाही. हा व्हिडिओ पाकिस्तानी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर नोमान हसनने आपला पाळीव वाघ आणि आपल्या भाच्यासोबत बनवला होता.
आम्ही (आज तक) पाहिलं की, डॉ. अब्दुल सत्तार खान नावाच्या एका एक्स युजरने व्हायरल व्हिडिओवर प्रतिक्रिया देत त्याला पाकिस्तानचे असल्याचे म्हटले आहे. सोबतचं हे देखील लिहिलं आहे की, या मुलाच्या परिवाराकडे अनेक वाघ आणि सिंह आहेत.
इथे हे सांगणे गरजेचे आहे की, पाकिस्तानचा कायदा सिंह-वाघ सारख्या प्राण्यांना आयात करण्याची परवानगी देतो आणि तिथे अनेक श्रीमंत लोक असे प्राणी आपल्याजवळ ठेवणे पसंत करतात.
'आज तक'ने हैदराबादमध्ये राहणारे डॉ. अब्दुल सत्तार यांच्याशी संपर्क केला. त्यांनी सांगितले की, या व्हिडिओमध्ये जो वाघ दिसत आहे, ते नोमान हसन नावाच्या पाकिस्तानी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा आहे. या माहितीच्या आधारे शोध घेतल्यानंतर आम्हाला हा व्हिडिओ नोमान हसन यांच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर मिळाला. इस्लामाबादमध्ये राहणारा नोमानच्या यूट्यूबवर जवळपास ११ मिलियन फॉलोअर्स आहेत. तो नेहमी सिंह-चित्ता यासारख्या प्राण्यांसोबत विविध व्हिडिओ शेअर करतो.
नोमानच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवर आम्हाला अनेक व्हिडिओ पाहायला मिळाले, ज्यामध्ये व्हायरल व्हिडिओ वाला मुलगा सिंह आणि वाघासोबत दिसत आहे. एका व्हिडिओमध्ये तो वाघाची चेन पकडून त्याच्याजवळ उभा आहे. यामध्ये वाघ कोणत्याही पिंजऱ्यात दिसत नाहीये. आणखी इतर व्हिडिओमध्ये तो वाघाची स्वारी करताना दिसत आहे.
'आज तक'ने व्हायरल व्हिडिओ विषयी अधिक माहितीसाठी नोमानशी संपर्क केला. त्याने सांगितलं की, हा व्हिडिओ इस्लामाबादचा आहे आणि यामध्ये दिसणारा मुलगा त्यांचा भाचा असद आहे. हा व्हिडिओ आम्ही प्लॅनिंग करून कॉमिक अंदाजात बनवला होता. माझ्याकडे २५ सिंह आणि वाघ आहेत. त्यांना मी आफ्रितेून आयात केलं आहे. या सर्व प्राण्यांना मी आमच्या ब्रीडिंग फार्ममध्ये ठेवतो.
आम्ही नोमानला हे देखील विचारलं की, या प्राण्यांपासून कोणतीही हानी होऊ नये म्हणून प्रशिक्षण कसे देता? त्याने सांगितले की, "जर तुम्ही कोणत्याही प्राण्याला लहानपणापासूनच पाळला तर, तो स्वत: प्रशिक्षित होतो. आणि तो कधी नुकसान पोहोचवत नाही. कधी कधी प्राण्यांची नखे लागतात. पण त्यांनी कधी आमच्यावर हल्ला केला नाही. "
हिन्दुस्तान टाईम्सच्या एका रिपोर्टनुसार, पाकिस्तानध्ये सिंह-चित्ते सारखे प्राणी पाळणे पैसे आणि शक्तीचे प्रतीक बनले आहे.
This story was originally published by aajtak {https://www.aajtak.in/fact-check/story/fact-check-child-t-shirt-in-tiger-jaws-but-twist-found-in-video-ntc-rptc-2164811-2025-02-11}, and republished by Pudhari as part of the Shakti Collective