Tahawwur Rana | २६/११ मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणाचे भारताकडे प्रत्यार्पण

PM मोदींच्या भेटीनंतर ट्रम्प यांची घोषणा
26/11 Mumbai terror attack
मुंबई 26/11 हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणा.(file photo)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणा (Tahawwur Rana) याचे भारताकडे प्रत्यार्पण करणार असल्याचे जाहीर केले. व्हाईट हाऊसमधील द्विपक्षीय बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या (PM Modi US Visit) संयुक्त पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी ही माहिती दिली.

२६ नोव्‍हेंबर २००८ रोजी (26/11 Mumbai Attack) झालेल्‍या दहशतवादी हल्ल्यातील दोषी तहव्वूर राणा (Tahawwur Rana) याचे भारताकडे प्रत्यार्पण करण्यास अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच मंजुरी दिली होती. तहव्वूर हा मूळ पाकिस्तानचा असून तो कॅनडाचा नागरिक आहे. मुंबईतील अनेक ठिकाणी झालेल्या हल्ल्यांत सहभाग असल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

"मला हे जाहीर करताना आनंद होत आहे की आमच्या प्रशासनाने २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि जगातील अत्यंत वाईट व्यक्तींपैकी एक असलेल्या तहव्वूर राणा याच्या भारताकडे प्रत्यार्पणाला मंजुरी दिली आहे. तो आता न्यायालयीन खटल्याला सामोरे जाण्यासाठी भारतात परत जाईल," असे ट्रम्प म्हणाले.

२००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या आणि सध्या लॉस एंजेलिसमधील तुरुंगात असलेल्या राणाच्या प्रत्यार्पणासाठी भारत सरकारने सातत्याने प्रयत्न केले. तो पाकिस्तानी-अमेरिकन दहशतवादी डेव्हिड कोलमन हेडलीशी जवळचा संबंध आहे. ज्याला 'दाऊद गिलानी' म्हणूनही ओळखले जाते. तो दहशतवादी हल्ल्यांमधील एक प्रमुख सूत्रधार आहे. त्याच्यावर हेडली तसेच लष्कर-ए-तैयबा (एलईटी) आणि पाकिस्तानमधील इतर दहशतवादी गटांना हल्ला घडवून आणण्यास मदत केल्याचा आरोप आहे.

"जगभरातील कट्टरपंथी इस्लामिक दहशतवादी धोक्याचा सामना करण्यासाठी भारत आणि अमेरिका यापूर्वी कधीही न पाहिलेल्या पद्धतीने एकत्रितपणे काम करतील," असे ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमधील पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

आम्हाला भारतासोबत चांगलं काम करायचंय- ट्रम्प

"मला वाटत नाही की भारताचे बायडेन प्रशासनाशी चांगले द्विपक्षीय संबंध होते. भारत आणि बायडेन प्रशासनामध्ये अशा काही गोष्टी घडल्या ज्या फारशा योग्य नव्हत्या. आम्ही एका अत्यंत हिंसक व्यक्तीला (तहव्वूर राणा) ताबडतोब भारतात परत पाठवत आहोत. आमच्याकडे अनेक विनंत्या असल्याने अजून बरेच काही काम करायचे बाकी आहे. म्हणूनच आम्ही दहशतवादाला आळा घालण्यासाठी भारतासोबत काम करत आहोत. आम्हाला भारताच्या हितासाठी चांगले काम करायचे आहे," असेही ते म्हणाले.

26/11 Mumbai terror attack
'पीएम मोदी माझ्यापेक्षाही चांगले वाटाघाटीकार', ट्रम्प यांच्याकडून मोदींचे कौतुक!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news