

वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : अमेरिकेतील एच-1बी व्हिसा धोरणात करण्यात आलेल्या मोठ्या बदलामुळे निर्माण झालेल्या गोंधळावर व्हाईट हाऊसने शनिवारी स्पष्टता दिली.
नव्या नियमांनुसार एक लाख डॉलर्सचे शुल्क हे फक्त नव्या अर्जदारांसाठी एकदाच आकारले जाणार असून, विद्यमान व्हिसाधारक किंवा नूतनीकरण करणार्यांवर त्याचा परिणाम होणार नाही, असे व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लीव्हिट यांनी सांगितले. अमेरिकेचे वाणिज्य सचिव हावर्ड लुटनिक यांनी शुक्रवारी या शुल्काची घोषणा केली होती. त्यांनी या शुल्काची अंमलबजावणी दरवर्षी व्हावी, असे सूचित केले होते.