इस्लामाबाद : पुढारी ऑनलाईन
पाकिस्तानचे भारतातील माजी उच्चायुक्त अब्दुल बसित यांनी चुकीचा फोटो शेअर करुन आपले हसे करुन घेतले. त्यांनी पॅलेट गनमुळे आपली दृष्टी गमवावी लागलेल्या एका काश्मिरी युवकाचा फोटो ट्विट केला. पण प्रत्याक्षात तो फोटो एका पॉर्नस्टारचा फोटो असल्याचे एका पाकिस्तानी पत्रकारानेच निदर्शनास आणून दिले.
पाकिस्तानची पत्रकार नाईला इनायत यांनी अब्दुल बसित यांच्या ट्विटचा स्क्रीनशॉट ट्विट करत 'भारतातील पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त अब्दुल बसित यांनी चुकून दृष्टी गेलेल्या काश्मिरी युवकाचा समजून जॉनी सिन्स या पॉर्नस्टारचा फोटो शेअर केला आहे.' अब्दुल बसित यांनी 'अनंतनागचा युसुफ… त्याने पॅलेट गनमुळे आपली दृष्टी गमावली….याच्यावर तुम्ही तुमचा आवाज उठवा.' असे ट्विट केले होते.
या प्रकारानंतर अब्दुल बसित यांनी आपले ट्विट डिलीट केले.