Israel Hamas War | 'मला मृत पतीचे शुक्रजंतू हवेत'; इस्रायलमध्ये मृतांचे शुक्राणू गोठवण्याची धडपड

Posthumous Sperm Retrieval (PSR) साठी नागरिकांचा आग्रह
Posthumous Sperm Retrieval (PSR) Israel Hamas War
युद्धात मारले गेलेल्या नागरिकांचे आणि सैनिकांचे शुक्रजंतू जतन करावेत, यासाठी इस्रायलमधील नागरिक प्रयत्न करत आहेत. Photo by Nadezhda Moryak: https://www.pexels.com/photo/paper-cutouts-illustration-of-fertilization-8685350/
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून युद्धाचा भडका उडालेला आहे. यात हमास आणि इस्रायल अशा दोन्ही बाजूंनी सैनिक आणि नागरिक मृत्युमुखी पडत आहेत. इस्रालयमध्ये जे सैनिक शहीद झाले आहेत, आणि नागरिक मारले गेले आहेत, त्यांच्या नातेवाईक मृत व्यक्तींतील शुक्रजंतू सुरक्षितरीत्या जतन करावेत यासाठी प्रयत्न करत आहेत.

Posthumous Sperm Retrieval (PSR) म्हणजे काय?

एखाद्या मृत पुरुषाच्या वृषणातून शुक्रजंतू काढण्याच्या प्रक्रियेला Posthumous Sperm Retrieval (PSR) असे म्हटले जाते. मृत्यूनंतर चोवीस तासांच्या आत ही प्रक्रिया केली जाते. इस्रायलमध्ये मृत अविवाहित पुरुषातून शुक्रजंतू काढण्यासाठी कौटुंबिक न्यायालयाची परवानगी घेतली जाते. तर मृत विवाहित पुरुषातून शुक्रंजंतू काढण्यासाठी बायकोने विनंती करावी लागते, आणि आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करायची असते.

जे युद्धात मारले गेले आहेत अशांचे शुक्रजंतू गोठवले जावेत आणि भविष्यात त्यातून संतती जन्माला यावी जेणे करून मृतांची आठवण जतन होईल, अशी लोकांची भावना आहे, असे टाइम्स ऑफ इस्रायलने म्हटलेले आहे.

'शुक्रजंतू गोठण्यात अडचणी'

डॉ. याईल हरीर इस्रायलमधील कप्लान मेडिकल सेंटरमध्ये एंब्रॉयोलॉजिस्ट आहेत. ते म्हणाले, "आम्ही सर्वसाधारणपणे वर्षाला एखादी अशी केस हाताळत होतो, आता ही संख्या फार वाढलेली आहे. मृतदेहातील शुक्रजंतू काढणे हे आमच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी मानसिक दृष्टिकोनातूनही त्रासदायक असते. यातून कसा मार्ग काढायाचे ते आम्ही पाहात आहोत." तसेच इतक्या मोठ्या प्रमाणावर शुक्रजंतू गोठवून ते जतन करण्यासाठीची यंत्रणाही आमच्याकडे नाही, हेही लक्षात घेतले पाहिजे, असे ते म्हणाले.

...पण वेळ सगळ्यांच्या हाती नसते

इस्रायलमधील चित्रपट निर्मात्या शायली अॅटारी यांच्या पतीचा शनिवारी हमासच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्यानंतर पतीचा मृतदेह मिळण्यासाठी त्यांना बराच वेळ गेला. तरीही त्यांनी मृत पतीच्या शरीरातून शुक्रजंतू काढण्याची प्रक्रिया पूर्ण केली. "माझ्या पतीचा मृतदेह बराच वेळ जास्त तापमानात राहिल्याने जे शुक्रजंतू मिळवले गेले ते वापरता येण्यासारखे नाहीत," अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news