

फायझर कंपनीचे माजी टॉक्सिकोलॉजिस्ट डॉ. स्टर्ज यांनी या विषयावर 'व्हॅक्सीन माफिया' नावाचे पुस्तकही लिहिले असून, जर्मनीच्या संसदेतही त्यांना या विषयावर साक्ष देण्यासाठी पाचारण करण्यात आले होते.
Elon Musk covid vaccine reaction
कोरोना काळात लस मिळविण्यासाठी जगभरात मोठी चढाओढ पाहायला मिळाली, आता याच कोरोना प्रतिबंधक लसीच्या दुष्परिणामांबाबत सध्या जगभरात एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. फायझरच्या एका माजी शास्त्रज्ञाने जर्मनीच्या संसदेत केलेल्या खळबळजनक दाव्यानंतर आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांनीही उडी घेतली आहे. "कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर मला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली होती आणि आपला जीव जातोय की काय, असे वाटले होते," असे विधान मस्क यांनी केले आहे.
फायझर कंपनीचे माजी टॉक्सिकोलॉजिस्ट (विषशास्त्रज्ञ), ज्यांनी २००७ मध्येच कंपनी सोडली होती.डॉ. स्टर्ज यांनी एका व्हिडिओद्वारे आपली भूमिका मांडली. सध्या त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्यांच्या मते लसीला मंजुरी देण्यापूर्वी आवश्यक असणाऱ्या पाच प्रमुख प्री-क्लिनिकल सेफ्टी मानकांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले.शॉर्टकट मार्गाचा अवलंब करून आणि पुरेशा चाचण्यांशिवाय या लसीला तातडीने मान्यता देण्यात आली होती, असा दावा डॉ. स्टर्ज यांनी केला आहे.
फायझर-बायोएनटेकची mRNA लस जगभरातील करोडो लोकांना दिली गेली. ती आरोग्यासाठी घातक ठरू शकते. डॉ. स्टर्ज यांनी या विषयावर 'व्हॅक्सीन माफिया' नावाचे पुस्तकही लिहिले असून, जर्मनीच्या संसदेतही त्यांना या विषयावर साक्ष देण्यासाठी पाचारण करण्यात आले होते.जर्मनीच्या संसदेत साक्ष देताना त्यांनी दावा केला की, mRNA तंत्रज्ञानावर आधारित या लसीला कधीच मंजुरी मिळायला नको होती. त्यांच्या दाव्यानुसार, एकट्या जर्मनीत या लसीमुळे सुमारे ६०,००० लोकांचा मृत्यू झाला असावा.
माजी शास्त्रज्ञ डॉ. स्टर्ज यांचा व्हायरल होणारा व्हिडिओ सोशल मीडियावर कोट्यवधी लोकांनी पाहिला आहे. त्यांनी केलेल्या खळबळजनक दाव्याला पाठिंबा देत मस्क यांनी स्वतःला आलेला अनुभव शेअर केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, "दुसरा डोस घेतल्यानंतर माझी प्रकृती इतकी खालावली होती की मला रुग्णालयात दाखल करावे लागले होते. त्यावेळी मला आपला जीव जातो की काय, असे वाटत होते." इतका गंभीर दावा समोर येऊनही मुख्य प्रवाहातील बातम्यांमध्ये याला स्थान का दिले गेले नाही, याबद्दल मस्क यांनी आश्चर्य व्यक्त केले.
एकीकडे जागतिक स्तरावर हा वाद सुरू असताना, भारतातील एम्स (AIIMS) ने केलेल्या एका अभ्यासात मात्र वेगळा निष्कर्ष काढण्यात आला आहे. एम्सच्या अहवालानुसार, तरुणांमधील हृदयविकाराच्या झटक्यांचा लसीकरणाशी थेट संबंध नसल्याचे म्हटले आहे. तरुणांमधील दोन-तृतीयांश मृत्यू हे आधीपासून असलेल्या हृदयविकारामुळेच झाल्याचे या अभ्यासात स्पष्ट करण्यात आले होते.