'सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वरील सायबर ॲटॅकमागे युक्रेन 'कनेक्‍शन'

मस्‍क यांनी व्यक्त केला संशय : 'X' सोमवारी अनेकवेळा झाले हाेते डाउन
Elon Musk
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) डाउन हाेण्‍यामागे युक्रेनचा हात असल्‍याचा आराेप मस्‍क यांनी केला आहे.File Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : जगातील सर्वात श्रीमंत उद्याेगपती एलॉन मस्‍क यांच्‍या मालकीचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) सोमवारी (दि. १० मार्च) जागतिक स्तरावर वारंवार डाउन झाले. याचा परिणाम जगभरातील वापरकर्त्यांवर झाला. मस्क यांनी याबाबत मौन सोडले असून, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरील सायबर हल्ल्यांमागे युक्रेन जबाबदार असल्‍याचा संशय त्‍यांनी व्‍यक्‍त केला आहे. ( twitter down )

'फॉक्‍स न्‍यूज'बरोबर बोलताना मस्‍क म्‍हणाले की, "प्रत्यक्षात काय घडले हे आम्हाला माहित नाही; परंतु युक्रेनमधून तयार झालेल्या आयपी पत्त्यांसह सायबर हल्लेखोरांनी 'एक्स'वर सायबर हल्‍ला केला. हा एक मोठ्या प्रमाणात सायबर हल्ला होता."

X प्लॅटफॉर्म दिवसभरात अनेकवेळा डाउन

सोमवार, १० मार्च रोजी प्लॅटफॉर्म X वरील सेवा दिवसातून अनेक वेळा बंद पडल्या.अनेकवेळा वापरकर्ते या प्लॅटफॉर्मवर प्रवेश करू शकले नाहीत. त्याचा परिणाम वेब आणि ॲप वापरकर्त्यांवर दिसून आला. याबाबत सोमवारी सकाळी १० वाजेपर्यंत अमेरिकेत ३९,०२१ वापरकर्त्यांनी तक्रार नोंदवली. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत, अहवालांची संख्या जवळजवळ निम्मी झाली होती.

twitter down : मस्क यांनी व्‍यक्‍त केला युक्रेनवर संशय

मस्क यांनी असेही म्हटले आहे की, त्यांच्या स्टारलिंक उपग्रह सेवेशिवाय युक्रेनला मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागू शकते, जरी त्यांनी आश्वासन दिले की ते ही सेवा बंद करणार नाहीत. दरम्‍यान, एका टेलिग्राम चॅनेलनुसार, पॅलेस्टिनी समर्थक हॅकर ग्रुप डार्क स्टॉर्म टीमने X वरील सायबर हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. गाझामध्ये इस्रायलच्या लष्करी कारवायांना पाठिंबा देणाऱ्या देशांना आणि संघटनांना लक्ष्य करण्यासाठी हा गट ओळखला जातो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news