

ऑस्ट्रियातील ग्राझ येथील एका शाळेत झालेल्या गोळीबारात पाच जण ठार झाले असून, अनेक जण जखमी झाले आहेत, असे वृत्त 'रॉयटर्स' या वृत्तसंस्थेने स्थानिक माध्यमांचा हवाला देऊन दिले आहे. हल्लेखोर विद्यार्थ्याने अंदाधूंद गोळीबार केल्यानंतर जीवन संपवले असावे, असे ब्रिटनस्थित इंडिपेंडेंटने ऑस्ट्रियन राज्य माध्यम 'ओआरएफ'चा हवाला देत म्हटलं आहे. या घटनेबाबत ऑस्ट्रिया सरकारने अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही.
ग्राझ येथील एका शाळेत आज सकाळी दहा वाजता गोळीबाराचा आवाज आला. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गोळीबारात गंभीर जखमींमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांचाही समावेश आहे. या घटनेचा सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये गोळीबारानंतर पोलिसांच्या गाड्या घटनास्थळी जाताना दिसत आहेत. दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये लोक आणि पोलिसांची वाहने घटनास्थळी असल्याचे दिसून आले आहे.
ऑस्ट्रियन पोलिसांच्या स्पष्ट केले आहे की, एका माध्यमिक शाळेत कारवाई सुरू होती. अधिकाऱ्यांनी इमारतीची झडती घेतली आणि परिसराला वेढा घातला आहे. जखमींना वैद्यकीय मदत दिली जात आहे. २० जून २०१५ रोजी ग्राझ येथे झालेल्या गोळीबारात तीन जण ठार झाले होते.