लेबनानमध्‍ये वॉकीटॉकी-पेजर स्‍फोटातील मृतांची संख्‍या 32 वर

Lebanon Pager Blast : तीन हजारांहून अधिक जखमी, हिजबुल्‍लाहमध्‍ये दहशत
walkie talkies pagers explode
Pudhari
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : लेबनानमध्‍ये गेल्या दोन दिवसांत पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटातील मृतांची संख्‍या 32वर गेली आहे. इराण-समर्थित हिजबुल्लाहच्या सदस्यांनी वापरलेल्या वॉकी-टॉकी, सौर उपकरणे आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा बुधवारी देशाच्या दक्षिण भागात स्फोट होऊन किमान 20 लोक ठार आणि लेबनॉन आणि सीरियाच्या काही भागांमध्ये अतिरेक्यांनी वापरलेल्या हजारो पेजर्सचा एकाच वेळी स्फोट होऊन 12 लोक ठार आणि 3,000 इतर जखमी झाल्याच्या एका दिवसानंतर बुधवारी ही घटना घडली. या स्फोटांसाठी हिजबुल्लाहने इस्रायलला जबाबदार धरले आहे. मात्र इस्रायलकडून याबाबत कोणतेही वक्तव्य करण्यात आलेले नाही. ( Lebanon Pager Blast)

मंगळवारी हिजबुल्लाह संघटनेचे सदस्यांनी वापरलेल्या पेजरचा समावेश असलेल्या स्फोटात १२ जण ठार झाले तर सुमारे २८०० हून अधिक जण जखमी झाले होते. या हल्‍ल्‍यातून हिजबुल्लाह सावरत असतानाच बुधवारी वॉकीटॉकी बॉम्बस्फोटात हिजबुल्लाचे 20 सदस्य ठार झाले. मंगळवारच्या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या अंत्यसंस्कारासाठी मोठ्या संख्येने लोक जमले होते, या स्फोटात अनेकांचा मृत्यू झाला होता. हिजबुल्लाहने या स्फोटांचा आरोप इस्रायलवर केला आहे. मात्र इस्रायलकडून याबाबत अद्याप काहीही सांगण्यात आलेले नाही. ( Lebanon Pager Blast)

शुक्रवारी संयुक्त राष्ट्रातही बैठक होणार

पेजरमध्ये झालेल्या स्फोटांबाबत असे सांगण्यात येत आहे की, पेजरमध्ये उत्पादनाच्या वेळी स्फोटके पेरण्यात आली होती. त्यामुळे पेजरमध्ये स्फोट झाले. हे स्फोट बेरूत, बेका व्हॅली आणि लेबनॉनमधील हिजबुल्लाचे वर्चस्व असलेल्या दक्षिणेकडील लेबनॉनमध्ये झाले.हिजबुल्लाचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दक्षिण बेरूतमध्ये चार जणांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी स्फोट झाला. या हल्‍ल्‍यामुळे आता पश्चिम आशियात संघर्ष वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनीही पश्चिम आशियातील संघर्ष वाढण्याची भीती व्यक्त केली आहे. लेबनॉनमधील घटनेबाबत शुक्रवारी संयुक्त राष्ट्रातही बैठक होणार आहे.l

पेजर्स, वायरलेस कम्युनिकेशन डिव्हाइसेसचा एकाचवेळी स्फोट

इराण समर्थक दहशतवादी गट हिजबुल्लाहचे हजारो सदस्य वापरत असलेले पेजर्स, वायरलेस कम्युनिकेशन डिव्हाइसेसचा मंगळवारी लेबनॉन आणि सीरियाच्या काही भागांमध्ये एकाच वेळी स्फोट झाला. सीरियामध्ये जवळपास १०० स्फोट झाले आहेत.

पेजर्सना कोडेड मेसेज पाठवल्यानंतर स्फोट

पेजर्सना कोडेड मेसेज आल्यानंतर स्फोट झाला, असा आरोप लेबनीज सुरक्षा सुत्रांनी रॉयटर्स वृत्तसंस्थेशी बोलताना केला आहे. "मोसादने डिव्हाइसमध्ये एक बोर्ड बसविला; ज्यामध्ये स्फोटक सामग्री असून त्याला एक कोड प्राप्त होतो. ते शोधणे खूप कठीण आहे. कोणत्याही डिव्हाइस किंवा स्कॅनरदेखील ते शोधता येत नाही," असे वृत्त रॉयटर्सने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे.

गोल्ड अपोलोकडून किती पेजर्स मागवले?

हिजबुल्लाहने तैवान (Taiwan) येथील गोल्ड अपोलो या कंपनीकडून ५ हजार पेजर्स मागवले होते. एप्रिल ते मे दरम्यान त्याची देशात तस्करी करण्यात आली होती. AP924 व्हेरिएंट असे स्फोट झालेल्या पेजरचे मॉडेल आहे. स्फोटाने नुकसान झालेल्या पेजर काही फोटो समोर आले आहेत. त्यात मागील बाजूस गोल्ड अपोलोने तयार केलेल्या पेजर सारखे स्टिकर्स आणि डिझाइनदेखील दिसून आले आहे.

पेजर्सवर एक मेसेज आला अन्...

स्काय न्यूज अरेबियाने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, इस्रायली गुप्तचर संस्था मोसादने डिव्हायसेसच्या बॅटरीवर PETN ही अत्यंत स्फोटक वस्तू ठेवली होती. परिणामी बॅटरीचे तापमान वाढल्याने त्यांचा स्फोट झाला. अमेरिकेच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पेजरचा मॉडेल क्रमांक AP924 असा होता. प्रत्येक पेजरमध्ये बॅटरीजवळ एक ते दोन स्फोटक जोडली होती. लेबनॉनमध्ये दुपारी साडेतीन वाजता या पेजर्सवर एक मेसेज आला. त्यानंतर पेजरमध्ये बसवलेली स्फोटक सक्रिय झाली, असे सूत्रांचे म्हणणे आहे. पेजरमधील स्फोटापूर्वी त्यात काही सेकंदांपर्यंत बीपचा आवाज आला आणि त्याचा स्फोट झाला, असे सांगण्यात आले आहे.

७ ऑक्‍टोबर २०२३ रोजी हमासने इस्रायलवर भीषण हल्‍ला केला. या हल्‍ल्‍यात १,१३९ जणांची हत्‍या करण्‍यात आला तर २००हून अधिक इस्‍त्रायली नागरिकांना ओलीस ठेवण्‍यात आले. आतापर्यंत या संघर्षात ४१ हजार २७२ लोक ठार झाले आहेत तर ९५ हजार ५५१ जखमी झाले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news