

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताच्या शेजारील अफगाणिस्तान सोमवारी (दि.10) भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी हादरला. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४ रिश्टर स्केल इतकी होती, परंतु भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून फक्त १० किलोमीटर खाली होता, त्यामुळे भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने सांगितले की भूकंपाचे केंद्र हिंदूकुश प्रदेश होते.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने म्हटले आहे की, पृष्ठभागावर होणारे भूकंप जमिनीत खोलवर होणाऱ्या भूकंपांपेक्षा जास्त धोकादायक असतात. पृष्ठभागावर होणारे भूकंप जास्त ऊर्जा सोडतात, ज्यामुळे जमिनीवरील संरचनांचे जास्त नुकसान होते. सध्या अफगाणिस्तानात भूकंपामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. याआधी पाकिस्तानमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले होते. ८ मार्च रोजी पाकिस्तानमध्ये झालेल्या भूकंपाची तीव्रता ४.२ होती आणि त्यामुळे कोणतेही नुकसान झाले नाही.