

पुढारी ऑनलाईन डेस्क : अफगाणिस्तानमध्ये आज (दि.२९ ऑगस्ट) सकाळी झालेल्या भूकंपाने अनेक शहरांमध्ये घबराट पसरली. सकाळी ११ वाजून २६ मिनिटांनी भूकंप झाला. त्याचा प्रभाव भारताची राजधानी दिल्ली आणि एनसीआरमध्येही जाणवला. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ५.७ एवढी नोंदली गेली आहे. . आतापर्यंत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही. ( Earthquake Hits Afghanistan)
दोन आठवड्यांपूर्वी अफगाणिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.८ इतकी मोजली गेली होती. यामध्ये कोणतीही जीवित वा वित्तहानी झालेली नाही. पृथ्वी हादरल्याबरोबर लोक घराबाहेर पडू लागले. अफगाणिस्तान भूकंपाच्या बाबतीत अत्यंत संवेदनशील आहे.
अफगाणिस्तानमध्ये २०२३ मध्ये झालेल्या भूकंपाने सुमारे ४ हजार लोकांचा मृत्यू झाला होता. तर ९ हजारांहून अधिक लोक जखमी झाले आहेत. १३ हजार घरांचे नुकसान झाले. या भूकंपाची तीव्रता ६.३ रिश्टर स्केल इतकी नोंदली गेली होती.