कोलंबिया : आपल्या मुलीचा थंडीपासून बचाव करण्यासाठी एका ड्रग्ज माफियाने १५ कोटी रुपयांची रोख रक्कम जाळल्याची घटना कधी काळी घडली होती. कोलंबिया येथील पाब्लो एस्कोबार जगातील सर्वात मोठा ड्रग्ज माफिया होता. त्याचे साम्राज्य इतके मोठे होते की, जगातील ८० टक्के कोकेन तो तयार करत होता. ड्रग्ज तस्करीसाठी त्याने सुमारे १५ हजार लोकांचा जीव घेतला होता.
१९८९ मध्ये 'कोर्ब्स मॅगझीन'ने त्याला जगातील सातवा श्रीमंत व्यक्ती म्हणून घोषित केले होते. त्याची एकूण संपत्ती २५ बिलियन डॉलर इतकी होती. पाब्लो एखाद्या राजासारखे जीवन जगत होता. त्याच्याकडे इतके पैसे होते की, त्याने गोदामात ठेवलेले कोट्यवधी रुपये उंदरांनी खाऊन टाकले होते. ड्रग्ज व्यवसायात आजवर इतका मोठा माफिया झालेला नाही. तो दररोज ४०० कोटी रुपये कमावत होता.
पैसे कमावण्यासोबत पैसे उडवण्यातही तो आघाडीवर होता. एकदा पोलिसांपासून स्वतःला वाचवण्यासाठी एका डोंगराळ भागात लपला होता. त्यावेळी सोबत त्याची मुलगीही होती. थंडीमुळे मुलीला हायपोथर्मिया झाला होता. आपल्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी त्याने यावेळी सुमारे १५ कोटी रुपये जाळले होते. २ सप्टेंबर १९९३ मध्ये पाब्लो याची हत्या करण्यात आली.