Iran- America War | UAE त अडकलेल्या प्रवाशांना राहण्यासाठी दुबईतील मराठी उद्योजक डॉ. धीरज जैन यांनी खुले केले आपले फार्महाऊस!

अनेक प्रवाशांना मिळाला दिलासा, भारतासह इतर देशातील 200 हून अधिक प्रवाशांनी घेतला आश्रय,
Iran- America War
डॉ. धिरज जैन
Published on
Updated on

Iran- America Warअमेरिकरा इराण युद्धाला आठ दिवस पूर्ण झाले आहेत. याचा फटका विमानसेवेला पूर्णपणे बसला आहे. दोन्ही बाजूकडून बॉम्बहल्ले होत असल्याने अनेक मध्यपूर्वेतिल हवाई वाहतूक पूर्णपणे बंद आहे. याचा फटका जगातील सर्वात व्यस्त असलेल्या दुबई विमानतळा बरोबरच इतर आसपासच्या शहरात असलेल्या विमानसेवांना बसला आहे. दुबईत पर्यटनासाठी आलेले, व्यावसाईक कारणांसाठी आलेले अनेक नागरिक येथे अडकून पडले आहेत. यात भारतात परत येणऱ्या नागिरकांना अधिक फटका बसला आहे. या सर्वांची राहण्याची सोय खूपच अवघड झाली आहे. अनेक हॉटेल्स बंद असल्यामुळे या प्रवाशांचा राहण्या खाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

यावेळी एक भारतीय उद्योजक या प्रवाशांसाठी धावून आला आहे त्‍याने आपले फार्म हाऊस या प्रवाशांसाठी खूले केले आहे. या उद्योगपतीचे नाव आहे डॉ. धिरज कांतिलाल जैन. दुबईत मिसाईल हल्ल्यानंतर त्‍यांनी हा निर्णय घेतला. त्‍यांनी आपल्या फार्म हाऊसवर मोठे मोठे टेन्ट उभारले आहेत. प्रवाशांच्या राहण्यासाठी शेल्टर होम तयार केले आहे.

Iran- America War
Fact Check | इराणचा अमेरिकेसाठी 'हवेचा' सापळा? हवेने भरलेल्या फुग्यांची शस्त्रास्त्रे दाखवून अमेरिकन लष्कराची दिशाभूल? सत्‍य काय?

अनेकांना मिळाला दिलासा

अनेक प्रवासी विमानतळावर अडकल्यानंतर काहीजण हॉटेलमध्ये राहिले पण आता 5 मार्चपासून ते या जैन यांच्या फार्महाऊसमध्ये राहत आहेत. या प्रवाशांमध्ये भारतासह, पाकिस्तान, फिलीफीन्स इत्‍यादी देशातील प्रवाशांचा समावेश आहे.

धिरज जैन 1 एक्स एल होल्डींग या कंपनीचे संस्थापक आहेत. त्‍यांनी युद्ध परिस्थिती आपल्या फार्महाऊसवर मोठे टेंट मारुन अन्न, पाणी, गाद्या ब्लँकेट, यासह इतर आवश्यक सुविधा प्रवाशांना दिल्या आहेत. या प्रवाशांना राहण्याच्या सुविधेबरोबरच योगा, वैद्यकीय सुविधा, इंटरनेट अशा सुविधाही पुरवण्यात आल्या आहेत. गेल्या 3 दिवसांत येथे 200 हून अधिक लोकांची राहण्याची सोय झाली आहे.

अनेकांनी मानले आभार

दुबईत पर्यटनासाठी गेलेल्या अनेकांना विमानसेवा बंद झाल्याच्या बातमीने धक्का बसला. अनेकजण अडकून पडल्याने घाबरले होते. राहण्या खाण्याची सोय कशी होते याची चिंता होती पण डॉ. जैन यांनी प्रवाशांसाठी ही सुविधा दिल्यामुळे अनेकांनी त्‍यांचे आभार मानले.

डॉ. जैन यांचा हा फार्महाऊस दुबईजवळच्या अजमान (Ajman) येथे असून तो ८०,००० स्क्वेअर फूटचा आहे.

डॉ. धीरज जैन यांनी प्रवाशांना हॉटेलमधून आणण्यासाठी ११ गाड्या तैनात केल्या आहेत,

त्यांनी आतापर्यंत ३०० हून अधिक प्रवाशांना (भारतीय, पाकिस्तानी, फिलिपिनो इ.) मोफत निवारा, जेवण आणि वैद्यकीय मदत दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news