

जगात अनेक देश राष्ट्रवादी होत आहेत. प्रत्येक देश आक्रमणवादी होत आहे याचा धोका जगाला आहे, कारण अनेक देश हे अणवस्त्रांनी सज्ज आहेत. अमेरिकेने नुकतेच व्हेनेजऐलावर कब्जा केला आहे. तसेच डोनाल्ड ट्रम्प यांची विस्तारवादी भूमिका अनेकांना धोकादायक वाटत आहेत. या सर्वांचा विचार करुन 'Bulletin of the Atomic Scientists' या संशोधक संघटनेने Doomsday Clock या प्रतिकात्मक घडयाळ ४ सेकंदानी पुढे घेतले आहे. आता या घडाळयात १२ वाजण्यासाठी ८५ सेकंद बाकी राहिले आहेत.
रात्री बारा वाजले म्हणजे जगाचा सर्वनाश होणार
हे घडयाळ म्हणजे एक प्रतिकात्मक वेळेसाठी तयार केले आहे. यामध्ये 12 वाजण्यासाठी 85 सेकंद शिल्लक राहिले आहेत. १२ वाजले की जगाचा सर्वनाश होणार आहे. 'Bulletin of the Atomic Scientists' ने २७ जानेवारी २०२६ रोजी 'डूम्सडे क्लॉक' (Doomsday Clock) च्या वेळेची घोषणा केली आहे. आता हे घड्याळ मध्यरात्रीपासून (विनाशापासून) केवळ ८५ सेकंद अंतरावर आहे. घड्याळाच्या ७९ वर्षांच्या इतिहासातील ही विनाशाच्या सर्वात जवळची वेळ आहे.
सध्या जग एका भीषण संकटाच्या उंबरठ्यावर उभे असल्याचा इशारा शास्त्रज्ञांनी दिली आहे. 'बुलेटिन ऑफ द ॲटॉमिक सायंटिस्ट्स' या संस्थेने मंगळवारी जाहीर केले की, जगाचा अंत दर्शवणारे प्रतिकात्मक घड्याळ 'डूम्सडे क्लॉक' आता मध्यरात्रीपासून फक्त ८५ सेकंद लांब आहे. गेल्या वर्षी (२०२५) ही वेळ ८९ सेकंद होती. यंदा त्यामध्ये ४ सेकंदांची घट झाल्यामुळे मानवाच्या अस्तित्वावरचा धोका वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.
अणुयुद्धाचा धोका वाढला
रशिया-युक्रेन युद्ध, इस्रायल आणि इराणमधील तणाव आणि 'न्यू स्टार्ट' (New START) सारख्या अणुकरारांची मुदत संपत असल्याने अण्वस्त्रांचा वापर होण्याची भीती वाढली आहे.
२०२५ हे वर्ष इतिहासातील सर्वात उष्ण वर्ष ठरले आहे. कार्बन उत्सर्जनावर नियंत्रण मिळवण्यात जागतिक नेत्यांना येत असलेले अपयश हे एक मोठे कारण आहे.
एआय तंत्रज्ञानाचे लष्करी वापर आणि त्याद्वारे पसरणारी चुकीची माहिती यामुळे जागतिक सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे
अमेरिका, रशिया आणि चीन यांसारख्या मोठ्या देशांमधील संवाद तुटल्याने सामूहिक सुरक्षा धोक्यात आली आहे.
डूम्सडे क्लॉक काय असते
हे एक प्रतिकात्मक घड्याळ असून त्याची स्थापना १९४७ मध्ये अल्बर्ट आईन्स्टाईन आणि मॅनहॅटन प्रकल्पातील मिशेल बायरुट Michael Bierut, या शास्त्रज्ञांने याची स्थापना केली होती. यामध्ये 'मध्यरात्र' (Midnight) म्हणजे जगाचा विनाश मानला जातो. घड्याळाचे काटे मध्यरात्रीच्या जितके जवळ असतील, तितका मानवी जीवनाला धोका अधिक असतो.