

वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : ब्रिटिश प्रिन्स हॅरी यांना अमेरिकेतून हद्दपार करण्यास अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नकार दिला आहे. ट्रम्प म्हणाले की, हॅरी यांना अमेरिकेतून बाहेर काढायचे नाही. त्यांच्यासमोर अनेक समस्या आहेत. हॅरी यांचे त्यांच्यासोबत वाद निर्माण झाला आहे. इतकेच नाही तर हॅरी यांनी ब्रिटिश राजघराण्यांशीही फारकत घेतली आहे. त्यामुळे सध्या ते खूपच अडचणीत आहेत.
वास्तविक हॅरीवर त्यांच्या व्हिसामध्ये ड्रग्जच्या वापराची माहिती लपवल्याचा आरोप आहे. हॅरी यांनी त्यांच्या आत्मचरित्रात कोकेन, गांजा आणि ड्रग्ज घेतल्याची कबुली दिली आहे. यानंतर, हेरिटेज फाऊंडेशनने हॅरीच्या व्हिसा अर्जावर प्रश्न उपस्थित केले आहे. ट्रम्प यांनी हॅरीचे व्हिसा प्रकरण पुन्हा उघड करण्याचे आदेश दिले आहेत. राजघराण्याशी झालेल्या वादानंतर प्रिन्स हॅरी यांनी अधिकृतपणे ब्रिटन सोडले आहे. त्यांचा नवीन पत्ता अमेरिकेचे कॅलिफोर्निया राज्यात आहे. हॅरी आणि त्यांची पत्नी मेगन आता ब्रिटनमधील त्यांचे घर फ्रोगमोर कॉटेज सोडले आहे.
हॅरी यांनी त्यांच्या स्पेअर या आत्मचरित्रात राजघराण्याबद्दल अनेक वादग्रस्त टिपण्या केल्या होत्या. यानंतर, हॅरी आणि त्यांचे वडील किंग चार्ल्स यांच्यात वाद निर्माण झाला होता, त्यानंतर चार्ल्स यांनी हॅरीला घर सोडण्यास सांगितले होते. मार्च 2021 मध्ये, प्रिन्स हॅरी आणि त्यांची पत्नी मेगन मार्कल यांनी एका टीव्ही चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत मेगनने राजघराण्यावर वंशवादाचा आरोप केला होता, राजघराणे त्यांचा मुलगा आर्चीला राजकुमार बनवू इच्छित नव्हते, कारण त्याच्या जन्मापूर्वी त्यांना भीती होती की त्याच्या त्वचेचा रंग काळा असू शकतो, असे मेगन यांनी म्हटले होते. मेगन म्हणाली होती की, माझी सर्वात मोठी चूक म्हणजे मी राजघराण्यावर विश्वास ठेवला. राजघराण्याने मला नेहमीच सुरक्षित ठेवण्याचे आश्वासन दिले होते, पण तसे काहीच घडले नाही.