

Donald Trump Statement: अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे रोज एक वक्तव्य करतात आणि जागतिक राजकारणात खळबळ उडवून देतात. आता डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत - पाकिस्तान यांच्यात न्युक्लिअर युद्धासोबतच आठ युद्ध थांबवल्याच्या वक्तव्याचा पुर्नउच्चार केला. त्यांनी आपल्या स्टेट ऑफ युनियन संबोधनात काही मोठे आणि धक्कादायक खुलासे केले आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे ऑपरेशन सिंदूर थांबवून त्यांनी पाकिस्तानच्या ३.५ कोटी लोकांचे प्राण वाचवल्याचे वक्तव्य केलं. ट्रम्प यांनी त्यांना पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी सांगितले होते की तुम्ही आता जर यात हस्तक्षेप केला नसता तर भारताच्या ऑपरेशन सिंदूरदरम्यान ३.५ कोटी लोक मारले गेले असते.
ट्रम्प यांचे हे वक्तव्य २०२५ च्या मे महिन्यात चार दिवस चाललेल्या लष्करी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आलं आहे. यावेळी पाकिस्तान बॅकफूटवर होता हे ट्रम्प यांच्या या नव्या दाव्यामुळं स्पष्ट होत आहे. डोनाल्ड ट्रम्प आपल्या वक्तव्यात म्हणतात, 'मी माझ्या पहिल्या १० महिन्याच्या कार्यकाळात कंबोडिया आणि थायलंडसह आठ युद्धे थांबवली आहेत. ही काही चेष्टा नाहीये. पाकिस्तान आणि भारत यांच्यात न्युक्लिअर युद्ध झालं असतं. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी मला सांगितलं की जर मी हस्तक्षेप केला नसता तर ३.५ कोटी लोकांचा मृत्यू झाला असता. तसेच पाकिस्तानी पंतप्रधानांचा देखील मृत्यू झाला असता.'
डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्त्रायल-हमास, इस्त्रायल - इराण, इजिप्त - इथियोपिया, भारत - पाकिस्तान, सर्बिया-कोसोवो, रवांडा-कांगो, अर्मानिया-अजरबैजान, कंबोडिया- थायलंड ही युद्धे थांबवल्याचा दावा केला आहे.
असं असलं तरी भारतानं पाकिस्तान सोबतचा लष्करी संघर्ष थांबवण्यात अमेरिकेची भूमिका होती हे कधीही मान्य केलेलं नाहीये. पाकिस्तानच्या डीजीएमओंनी विनंती केल्यानंतर आपण लष्करी कारवाई थांबवल्याचं भारतानं वेळोवेळी स्पष्ट केलं.
दरम्यान, भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर लष्करी संघर्ष थांबवण्यात अमेरिकेचा हात होता का असं विचारताच त्यांनी युएस युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेमध्ये होता. त्यांनी अप्रत्यक्षरित्या भारत - पाकिस्तान संघर्षात अमेरिकेची भूमिका नव्हती असं सांगितलं.
भारताचे विदेश सचिव विक्रम मिसरी यांनी देखील सीज फायरमध्ये अमेरिकेची भूमिका नाकारली आहे. त्यांनी पाकिस्तानच्या डायरेक्टर जनरल ऑफ मिलिट्री ऑपरेशनने हॉटलाईनवर भारताच्या समपदस्थांशी संपर्क करून संघर्ष संपवण्याची विनंती केली होती. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये युद्धविरामावर सहमती झाली.