Donald Trump Assassination: मोज्तबा खामेनी बदला घेणार; संधी मिळताच ट्रम्प यांचा काटा काढणार.... तज्ज्ञाचा धक्कादायक दावा

Donald Trump Assassination
Donald Trump Assassinationpudhari
Published on
Updated on

Donald Trump Assassination: पाकिस्तानातील इस्लामाबादमध्ये अमेरिका, इराण यांच्यातील शस्त्रसंधी बोलणी आजपासून सुरू होत आहेत. यासाठी इराणचे आणि अमेरिकेचे शिष्टमंडळ पाकिस्तानमध्ये दाखल झालं आहे. इस्लामाबादला एका किल्ल्याप्रमाणे सुरक्षा देण्यात आली आहे.

या शस्त्रसंधीच्या अवघड वाटाघाटीबाबत तज्ज्ञ इयान ब्रेमर यांनी काही धक्कादायक शक्यता वर्तवल्या आहेत. त्यांनी इराणचे सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनी हे आपल्या वडिलांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी उतावळे झाले आहेत असा दावा केला आहे.

एका न्यूज चॅनलशी बोलताना जगातील एक विख्यात रिस्क अॅनलिस्ट आणि युरेशिया ग्रुपचे संस्थापक ब्रेमर म्हणाले की, खामेनी हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कोणत्याही क्षणी हत्या करू शकतात.

दीर्घ मुलाखतीदरम्यान, ब्रेमर यांनी सांगितलं की, इस्लामाबाद मध्ये सुरू असलेली चर्चा ही एक सकारात्मक घडामोड आहे. मात्र असं असलं तरी स्ट्रेट ऑफ होर्मुझ अजून पूर्णपणे ओपन झालेली नाही. सध्याच्या घडीला २४ तासात फक्त ७ मालवाहू जहाजेच इथून पास होऊ शकतात. त्या देखील इराणची परवानगी मिळाली तर पुढं सरकत आहेत.

ब्रेमर यांनी इराण- अमेरिका चर्चेत मोज्तबा फॅक्टर बाबत देखील आपलं मत व्यक्त केले आहे. त्यांना इराण आता जरा अतीच करत आहे का असं विचारलं असता त्यांनी याची मोठी शक्यता आहे. ज्यावेळी अली खामेनी आणि त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांचा अमेरिका आणि इस्त्रायल यांच्या हल्यात मृत्यू झाला त्यानंतर मोज्तबा यांना इराणच्या सर्वोच्च नेत्याच्या पदावर बसवण्यात आलं. तेव्हापासूनच इराण अतिरेक करत आहे.

ब्रेमर म्हणाले, 'मला वाटत नाही की खामेनी शांत बसतील. मला असं वाटतं की जर त्यांना अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या कशी करायची आहे हे समजलं तर ते क्षणात ती गोष्ट करतील. बदला घेण्याची प्रेरणा त्यांना असं करण्यास मदत करेल. या युद्धात एक समस्या निर्माण झाली आहे. या युद्धात अमेरिकेने इराणला चांगलंच एकटं पाडलं आहे. त्यामुळं ते आता चांगलं वागू शकत नाहीत. पुढं जाण्यासाठी तार्किक निर्णय करण्याची क्षमता गमावून बसले आहेत.'

'ज्यावेळी तुम्ही अशा गोष्टी क्रांतीकारी, धार्मिक प्रवृत्तीच्या सरकारविरूद्ध करता त्याचा परिणाम हा खूप जास्त धोकादायक असतो.' असा इशारा देखील ब्रेमर यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news