पुढारी ऑनलाईन डेस्क
मित्रांनो तुम्हाला विचारलं की, माणसाच्या आयुष्यातील सर्वात महत्वाची आणि आनंद देणारी गोष्ट कोणती? तर, तुम्ही काय उत्तर द्याल? पद, पैसा आणि सन्मान, अशी उत्तरं सरधोपटपणे दिली जातात. पण, खरं सांगू… माणसाच्या आयुष्यातील सर्वात महत्वाची आणि अत्यांनंद देणारी गोष्ट आहे सेक्स! मनुष्याच्या जीवनाचा नैसर्गिक भाग म्हणजे सेक्स होय. सेक्सबद्दलचीदेखील काही इथिक्स म्हणजेच तत्वं असतात. याच सेक्सबद्दल जगातील अनेक नामवंत विचारवंतांनी, शास्त्रज्ञांनी, तत्ववेत्त्यांनी आणि धर्मपंडितांनी आपापली मतं मांडलेली आहेत. ही इंटरेस्टिगं मतं आपण जाणून घेऊ…
पायथोगोरस ः ज्यानं थोडंफारदेखील शिक्षण घेतलंय त्याला 'पायथागोरस' हे नाव नक्कीच माहीत असेल. ज्याचे सिद्धांत परीक्षेमध्ये लिहून आपण मार्क्स मिळवलेत. पायथागोरसचे गणितातील प्रमेय माहीत नसणारा मनुष्य दुर्मिळच म्हणावा लागेल. असो. त्यानं आपल्या शिष्यांना 'सेक्स'बद्दल काही टिप्स दिलेल्या होत्या. पायथागोरस असं म्हणतो की, "जोपर्यंत तुम्ही २० वर्षांचे होत नाही तोपर्यंत अजिबाद सेक्स करू नये. कारण, तुम्ही उत्तेजित झालात आणि सेक्स केलात, तर त्याच्याने समोरचा माणूस सामर्थ्यवान होतो. सेक्स हा माणसासाठी नेहमीच वाईट असतो." यावर त्याच्या शिष्यांनी पायथागोरसला विचारलं की, एखाद्या स्त्रीसोबत सेक्स करण्याची योग्य वेळ कोणती? पायथागोरस म्हणतो की, "जेव्हा तुम्हाला तुम्ही ताकद गमवायची असेल तेव्हा सेक्स करावा."
ॲरिस्टॉटल ः शिक्षण व्यवस्थेतील प्रत्येक शाखेत आणि प्रत्येक विषयांमध्ये ॲरिस्टॉटलचं नाव येतं म्हणजे येतंच. कारण, प्रत्येक विषयांमध्ये ॲरिस्टॉटलने आपलं अमूल्य विचार मांडले आहेत. असं असलं तरी त्याचे काही विचार न पटणारे आहेत. तो पुरूषाला श्रेष्ठ मानतो, तर स्त्रीला कनिष्ठ मानतो. असो. सेक्सबद्दल ॲरिस्टॉटल म्हणतो की, "बहुतांशी असा विचार केला जातो, सेक्स करताना स्त्री ही पुरुषाबरोबरीने वीर्यस्त्राव सोडत असते. कारण तिचा आनंद हा कधीकधी पुरुषासारखाच असतो. परंतु, हा वीर्यस्त्राव वेगळा असत नाही. स्त्रीचा वीर्यस्त्राव महत्वाचा आहे. कारण, गर्भधारणेसाठी महत्वाचा असतो." स्त्रीचा वीर्यस्त्राव होत नसेल तर भीती वाटण्याचे कारण नाही. कारण, ॲरिस्टॉटल त्यावरील उपाय सांगतो की, "काही झणझणीत पदार्थ खाल्ल्याने स्त्रीचा वीर्यस्त्राव वाढतो", अशी माहिती ॲरिस्टॉटलने सांगून ठेवलेली आहे.
इम्यॅन्युअल कांट ः सामाजिक शास्त्रांमध्ये इम्यॅन्युअल कांट एक महत्वाचा विचारवंत होऊन गेला. काही विचारांच्या मांडणीत इम्यॅन्युअल कांटचे विचार आपल्याला पटत नसतील. पण, त्याने मांडलेल्या विचारांना दुर्लक्षदेखील करता येत नाही. कांटने आपल्या 'लेक्चर्स ऑन इथिक्समध्ये' सेक्सबद्दलचे विचार मांडले आहेत. तो म्हणतो की, "माणूस स्वतःच्या सेवेसाठी दुसऱ्या माणसाला एक साधन म्हणून वापरतो. माणूस सेक्समध्ये समोरच्या व्यक्तीची संमती जरूर घेत असेल; पण त्यामध्ये स्वतःचा काही उद्देशही असतो. लैंगिक पेरणा किंवा उत्तेजित झाल्याशिवाय एखाद्या व्यक्तीला भोगणं हा सेक्सचा मार्ग असू शकत नाही. आपली प्रिय व्यक्ती संभोगप्रिय प्रेमातूनचे तयार होते. त्यावेळी सेक्स ही एक शारीरिक भूक असते आणि ही भूक तितक्याच लवकर क्षमते. थोडक्यात काय तर एखादे रसभरीत फळ चोखून घ्यावे आणि फेकून द्यावे, असाच माणसाचा सेक्स असतो.