इम्रान खान यांच्या पक्षाकडून निदर्शने

लष्कराला पाचारण; मोबाईल, इंटरनेटवर बंदी : आंदोलकांवर सौम्य लाठीमार
Demonstrations from Imran Khan's party
इम्रान खान यांच्या पक्षाकडून निदर्शने.Pudhari File Photo
Published on
Updated on

इस्लामाबाद; वृत्तसंस्था : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ (पीटीआय) या पक्षाने पंतप्रधान शाहबाज शरीफ सरकारविरोधात निदर्शने करण्याचा इशारा दिला आहे.

इम्रान खान यांना विविध आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. ते वर्षभरापासून तुरुंगात आहेत. या पार्श्वभूमीवर पीटीआयने खान यांच्या सुटकेसह देशातील महागाईविरोधात निदर्शनाचा इशारा दिला आहे. निदर्शनाच्या पार्श्वभूमीवर इस्लामाबाद, लाहोरसह अन्य शहरांत लष्कराने कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी मोठा फौजफाटा तैनात केला आहे. शांघाय परिषद 15 ते 16 ऑक्टोबर या दरम्यान होणार आहे. त्यामुळे लष्कराने 5 ते 17 ऑक्टोबरपर्यंत कडक बंदोबस्त तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.

जयशंकर यांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन

या महिन्यात पाकिस्तानात शांघाय परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर या परिषदेस उपस्थित राहणार आहेत. इम्रान खान यांच्या पक्षाने जयशंकर यांना निदर्शनामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news