दीपा आंबेकर न्यूयॉर्कच्या पहिल्या मराठी न्यायाधीश

न्यूयॉर्क : वृत्तसंस्था

अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या फौजदारी न्यायालयाच्या न्यायाधीशपदी मराठमोळ्या दीपा आंबेकर यांची निवड झाली आहे. या निवडीनंतर त्या न्यूयॉर्कमधील पहिल्या मराठी आणि तिसर्‍या भारतीय महिला न्यायाधीश ठरल्या आहेत. यापूर्वी दीपा यांनी मोठ्या पगाराची नोकरी सोडून तब्बल 70 टक्के कमी वेतनावर लीगल एड्स सोसायटीसाठी काम केले आणि दोन हजार गरजू व्यक्‍तींचे खटले लढले.

युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन, अ‍ॅन हार्बर विद्यापीठातून दीपा यांनी अर्थशास्त्र विषयात पदवी मिळवली. अटलांटा शहरात कमी आर्थिक स्तरातील लोकवस्तीच्या शाळेत त्या शिकवत होत्या. अ‍ॅक्सेन्चर या सल्लागार कंपनीत नोकरी करत त्यांनी कायद्याची पदवी मिळवली.

 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news