सुंदर पिचाईंची माहिती नसलेली गोष्ट, वडिलांचा १ वर्षाचा पगार ‘यासाठी’ केला होता खर्च! 

Published on
Updated on

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

मूळ भारतीय वंशाचे सुंदर पिचाई यांना आज संपूर्ण जगात गूगलचे सीईओ म्हणून ओळखले जातात. त्यांचा हा प्रवास सहजसोपा नाही. तुम्हाला पिचाई यांच्याबाबतच्या काही खास गोष्टी कदाचित नसतील. एका व्हर्चुअल ग्रॅज्युएशन सेरेमनीच्या कार्यक्रमात पिचाई यांनी विद्याथर्यांना मार्गदर्शन केले आणि धीर न सोडण्याचा सल्ला दिला. यावेळी त्यांनी आपल्या कठीण काळात कसा संघर्ष केला, याबद्दलही सांगितले. 

यामध्ये अनेक लीडर्स, स्पीकर्स, सेलेब्रिटी आणि यूट्यूब क्रिएटर्स सहभागी झाले होते. रविवारी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सुंदर पिचाई म्हणाले की, पहिल्यांदा अमेरिकेत पोहोचल्यानंतर ज्याची मी कल्पनादेखील केली नव्हती, असं घडलं होतं. 

सुंदर पिचाई यांनी आपल्या संघर्षाचे दिवस आठवत सांगितले की, ते २७ वर्षांचे होते, तेव्हा भारत सोडून अमेरिकेतील स्टॅनफोर्ड युनिव्ह​र्सिटीमध्ये शिकण्यासाठी आले होते. ते म्हणाले, 'माझ्या वडिलांनी त्यांचा वर्षभराच्या पगाराची रक्कम माझ्या तिकिटावर खर्च केली होती. मला स्टॅनफोर्डमध्ये शिकता यावं, यासाठी माझ्या वडिलांनी कष्ट केले. विमानातू प्रवास करण्याचा हा माझा पहिलाच अनुभव होता.' 

ते म्हणाले, जेव्हा पहिल्यांदा ते कॅलिफोनिर्या येथे गेले तेव्हा तेथील स्थिती तशी नव्हती, जशी त्यांनी कल्पना केली होती. 

एका मिनिट फोन कॉलसाठी २ डॉलरचा खर्च 

जुन्या आठवणींना उजाळा देत पिचाई महणाले, अमेरिका खूप महाग देश होता. भारतात एक मिनिट फोन कॉल करण्यासाठी २ डॉलर खर्च करावे लागत होते. एका बॅगेची किंमत माझ्या वडिलांच्या महिनाभराच्या पगाराइतकी होती. 

अमेरिकेत गेल्यानंतर त्यांना अंदाजदेखील नव्हता की, त्यांचे जग कसे बदलेल. 'मला या पदापर्यंत एका गोष्टीने आणले ते म्हणजे माझे भाग्य. मला टेक्नॉलॉजीचं वेड होतं आणि त्याला अनुसरूनच माझी वाटचाल सुरू राहिली.'

चेन्नईत गेलं बालपण 

सुंदर पिचाई यांचे बालपण तामिळनाडूतील चेन्नईमध्ये झाले. त्यांनी आयआयटीतून शिक्षण घेतले. त्यानंतर पिचाई यांनी स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीतून शिक्षण घेतले आणि व्हॉर्टन स्कूलमधून एमबीए केलं. २००४ मध्ये त्यांनी गूगलमध्ये नोकरी सुरू केली होती. यादरम्यान, ते गूगल टूलबार आणि गूगल क्रोमचे लीड डेव्हलपमेंट टीममध्ये होते. आता हे जगातील सर्वात लोकप्रिय वेब ब्राउजर म्हणून ओळखले जाते. 

 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news