Pakistan Army And Police Clash : पाकिस्तानात गृहयुद्धाची ठिणगी! खैबर पख्तूनख्वा प्रांतात पोलिसांचा लष्करावर हल्ला

पाकिस्तानमध्ये लष्कर आणि पोलिसांमध्ये चकमक झाली आहे. पोलिसांनी पाकिस्तानी लष्काच्या सैनिकांना आणि त्यांच्या उच्च अधिकाऱ्यांना कडक शब्दांत फटकारले आहे.
Pakistan Army And Police Clash
Published on
Updated on

Pakistan Army And Police Clash

नवी दिल्ली : भारताविरुद्ध बरळ ओकणा-या पाकिस्तानातमध्ये अंतर्गत कलहाचा भडका उडाला आहे. शत्रू राष्ट्रातील परिस्थिती दिवसेंदिवस हाताबाहेर जात असल्याचे समोर येत आहे. नुकतेच खैबर पख्तूनख्वा प्रांतात थेट लष्कर आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. या संघर्षात पोलिसांनी इतका आक्रमक पवित्रा घेतला की त्यांनी लष्कराच्या अधिका-यांना, ‘तुमचा जनरल इथे आला तरी काहीही होणार नाही,’ असा दम दिला. इंडिया टीव्हीने याबाबत वृत्त दिले असून त्यांनी याबाबतच्या सविस्तर घटनेचा व्हिडिओ त्यांच्या @indiatvnews या X हँडलवर शेअर केला आहे.

या घटनेतून स्पष्ट होतं की, पाकिस्तानची सुरक्षा व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. एकीकडे भारताविरुद्ध दिवसरात्र बरळणारे वक्तव्य करणारे पाकिस्तानी नेते, आता स्वतःच्या घरातच पेटलेल्या संघर्षावर नियंत्रण ठेवू शकत नाहीत.

पोलिस आणि लष्करातील हा संघर्ष एवढे तीव्र झाला की, रस्त्यावर एकमेकांना झापण्याची वेळ आली. खैबर पोलिसांनी लष्कराच्या जवानांशी अत्यंत कठोर शब्दांत बोलत, त्यांचं वर्चस्व नाकारलं. ‘पोलिसांनी लष्कराची लाज काढली’ अशी भावना सोशल मीडियावरही तीव्र होत आहे.

या घटनेमुळे पाकिस्तानात केवळ सुरक्षेची नाही, तर राज्यघटनात्मक सत्तेचीही विश्वासार्हता धोक्यात आली आहे. आता लष्कर आणि पोलिस जर एकमेकांवरच चढाई करत असतील, तर सामान्य नागरिकांचं काय?

नेमकं काय घडलं?

माहितीनुसार, खैबर पोलिसांच्या कार्यक्षेत्रात लष्कराने हस्तक्षेप केल्याने दोघांमध्ये तणाव निर्माण झाल्याचे समोर आले आहे. यावेळी संतप्त झालेल्या पोलिसांनी पाकिस्तानी लष्कराची पोलखोल केली. खैबर पोलिस म्हणाले, ‘तुमचं डोकं खराब आहे. तुम्ही लोक काहीही करू शकत नाही. तुमची ताकद बॉर्डरवर दाखवा. इथे काय करताय. तुमचा जनरल इथे आला तरी तुम्ही काहीही करू शकत नाही. तुमच्या जनरललाही आम्ही बुटाच्या टोकावर ठेवतो. बंदूक खाली ठेवा. तुमच्या भ्याडपणाची आम्हाला कल्पना आहे,’ असे म्हणत पाकिस्तानी लष्कराची अब्रू वेशीवर टांगली.

खरं तर, याठिकाणी पोलिस आणि लष्कर यांच्यातील तणाव पूर्वीपासूनच आहे. इथे राहणारे पश्तून नागरिकही लष्कराच्या विरोधात आहेत. तज्ज्ञांचं मत आहे की हा संघर्ष लष्कराविरुद्ध मोठ्या बंडाचा कारण बनू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news