चीनकडून अमेरिकेच्या ‘ट्रेझरी’वर सायबर दरोडा!

महत्त्वपूर्ण माहिती लांबवली; ‘एफबीआय’कडून तपास सुरू
US-China cyber conflict
चीनकडून अमेरिकेच्या ‘ट्रेझरी’वर सायबर दरोडा!file photo
Published on
Updated on

वॉशिंग्टन : चिनी हॅकर्सनी अमेरिकेचे ट्रेझरी डिपार्टमेंट (कोषागार विभाग) हॅक केल्याचे उघडकीला आले आहे. हे हॅकर्स चीन सरकारनेच प्रायोजित केलेले आहेत, असा थेट आरोप अमेरिकेने केला आहे.

ट्रेझरी विभागाच्या थर्ड पार्टी सॉफ्टवेअर प्रदात्याच्या सिस्टीममध्ये हॅकरने प्रवेश केला आणि मोठ्या प्रमाणावर डेटा चोरी केली. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच या सायबर दरोड्याला सुरुवात झाली होती. ट्रेझरीने अगदी अलीकडे ही माहिती सिनेटर्सना दिली. ‘एफबीआय’ (मध्यवर्ती तपास यंत्रणा) आणि इतर यंत्रणा संयुक्तपणे या गुन्ह्याचा तपास करत आहेत. डेटा चोरीचे संभाव्य विपरीत परिणामही तपासत आहेत.

सेवा आता ऑफलाईन सुरू आहे. यापुढे हॅकर्सना ट्रेझरीत प्रवेश मिळणार नाही, असे पाहिले जाईल.

- आदिती हर्डीकर, सहायक कोषागार सचिव, अमेरिका

महासत्ता त्राही त्राही!

  • चिनी सायबर दरोड्यांमुळे अमेरिका आधीच त्रस्त आहे. सॉल्ट टायफून नावाच्या सायबर हल्ल्यात अनेक अमेरिकन टेलिकम्युनिकेशन कंपन्यांचे नेटवर्क हॅक केले गेलेले आहे.

  • लोकांचे कॉल रेकॉर्डही चीनच्या सरकारी अधिकार्‍यांपर्यंत पोहोचलेले आहेत. चिनी सायबर हॅकिंगमुळे प्रभावित झालेल्या दूरसंचार कंपन्यांची संख्या अमेरिकेत 9 वर पोहोचली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news