Russia China alliance | ... तर तिसर्‍या महायुद्धाचा धोका

अमेरिकन गुप्तचरांच्या अहवालात चीन-रशिया युती
Russia China alliance |
Russia China alliance | ... तर तिसर्‍या महायुद्धाचा धोका
Published on
Updated on

वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर हा संघर्ष अधिक व्यापक होण्याचा धोका असल्याचा गंभीर इशारा अमेरिकन गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. सीबीएस न्यूजच्या वृत्तानुसार, चीन आणि रशिया हे इराणला विविध प्रकारे मदत करण्याचे पर्याय तपासत आहेत. त्यातून हे युद्ध तिसर्‍या महायुद्धासारख्या भीषण संकटाकडे जाऊ शकत असल्याचे संकेत मिळत आहे.

युद्ध विस्ताराची भीती वाढली

युद्ध सुरू झाल्यानंतर काही दिवसांतच अमेरिकेच्या डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सीने प्राथमिक विश्लेषणात असे नमूद केले की, हा संघर्ष केवळ मध्यपूर्वेपुरता मर्यादित राहणार नाही. चीन आणि रशिया यांची संभाव्य भूमिका या युद्धाला अधिक गुंतागुंतीचे रूप देऊ शकते.

चीनकडून प्रगत रडार देण्याचा विचार

चीन इराणला एक्स-बँड रडार प्रणाली देण्याचा विचार करत होता. या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे इराणची संरक्षण क्षमता मोठ्या प्रमाणात वाढू शकते. विशेषतः, कमी उंचीवर उडणारे ड्रोन आणि क्रूझ क्षेपणास्त्र ओळखणे आणि त्यांचा मागोवा घेणे अधिक सोपे होईल. अमेरिकन अधिकार्‍यांच्या मते, ही मदत इराणी हवाई संरक्षण व्यवस्थेला मजबूत करू शकते आणि भविष्यातील हल्ल्यांपासून त्याला अधिक सुरक्षित बनवू शकते.

मोठ्या शक्तींमध्ये अनौपचारिक युती?

अमेरिकन विश्लेषकांच्या मते, चीन आणि रशिया यांची संभाव्य मदत ही केवळ तात्पुरती नाही, तर अमेरिकेच्या प्रभावाला आव्हान देण्यासाठी मोठ्या शक्तीमध्ये एक अनौपचारिक युती तयार होत असल्याचे संकेत आहेत. जागतिक राजकारणात नवे समीकरण निर्माण होण्याची शक्यता आहे.

रशियाकडून गुप्त माहिती

रशियाने इराणला मध्यपूर्वेतील अमेरिकन लष्करी ठिकाणांची गुप्त माहिती दिल्याचे आधीच समोर आले आहे. या माहितीमुळे इराणला रणनीती आखताना फायदा झाला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पुढील घडामोडींवर जगाचे लक्ष

या पार्श्वभूमीवर, अमेरिका-इस्रायल-इराण संघर्षात चीन आणि रशियाची भूमिका किती निर्णायक ठरेल, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. जर या देशांनी थेट किंवा अप्रत्यक्ष हस्तक्षेप वाढवला, तर हा संघर्ष जागतिक पातळीवर मोठ्या युद्धात परिवर्तीत होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news