China Lab Monkey |चिनमध्ये एक माकड विकले जातेय 19 लाखाला : काय आहे कारण, कोणत्‍या प्रयोगांसाठी होताे वापर?

बायोटेक क्षेत्राचा विस्तार वाढल्याने लॅबच्या संख्येत लक्षणिय वाढ,
China Lab Monkey
China Lab Monkey चिनमध्ये एक माकड विकले जातेय 19 लाखाला
Published on
Updated on

China Lab Monkey सध्या चिनमध्ये प्रयोगासाठी वापरल्या जाणाऱ्या माकडांना (Cynomolgus Macaques) मोठी डिमांड आल्याचे दिसून येत आहे. यामुळे अशा माकडांच्या किमती येथे गगनाला भिडल्या असल्याचे दिसून येत आहे. एका माकडाची किंमत जवळपास 1.5 युआन म्हणजे भारतीय रुपयांमध्ये 19 लाखांपर्यंत जाऊन पोहचली असल्याचे दिसून येत आहे. चिन सध्या सर्वच क्षेत्रात अमेरिकेला टक्कर देत आहे. तंत्रज्ञानात तर जगातील सर्वच देशांना मागे टाकले आहे. अक्राळ विक्राळ स्वरुपात चिनमध्ये सध्या बदल होत आहेत.

आता बायोटेक क्षेत्रात चिन प्रचंड वेगात प्रगती करत आहे. लॅब बायोटेक रिसर्च क्षेत्राचा प्रचंड विस्तार झाला. विदेशी गुंतवणूक, आयपीओ यामुळे कॅपीटल प्रचंड आले आहे. अनेकजण या क्षेत्रात भविष्यातील संधी म्हणून पाहत आहेत. यामुळे लॅब मंकीची मागणी प्रचंड वाढली आहे. यामुळे गेल्या वर्ष भरात किंमतींमध्ये 50 टक्के अधिक वाढ झाली आहे. गुंतवणुकीचे प्रमाण वाढल्याने अनेक नवे रिसर्च प्राजेक्ट निर्माण होत आहेत. २०२५-२६ मध्ये चिनी औषध कंपन्यांनी विदेशी कंपन्यांशी कोट्यवधी डॉलर्सचे करार केले आहेत. या प्रकल्पांना गती देण्यासाठी माकडांची गरज वाढली आहे पण यासाठी लागणारी माकडे खूप कमी प्रमाणात आहेत.

काय केला जातो माकडांवर प्रयोग ?

मोठ्या CRO (Contract Research Organization) कंपन्या अनेक मोठ्या औषध कंपन्याकडून येणारी नवी औषधे या माकडांवर प्रथम करतात. त्‍याचे निरीक्षण केले जाते औषध योग्य प्रकारे काम करते याची चाचणी घेतली जाते. पण सध्या पण मंकी शॉर्टेज मुळे अनेक CRO कंपन्यानी आपल्या ट्रायल थांबवल्या आहेत. गेले अनेक महिने त्‍यांच्याकडे माकडेच नसल्यामुळे हे घडले आहे.

मानवी चाचण्यांपूर्वी (Human Trials) औषध सुरक्षित आहे की नाही हे पाहण्यासाठी माकडांवर प्रयोग करणे बंधनकारक असते.

अल्झायमर (Alzheimer's) आणि पार्किन्सन (Parkinson's) सारख्या मेंदूशी संबंधित गंभीर आजारांवर उपचार शोधण्यासाठी

जनुकीय बदल करून मानवी आजार बरे करण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयोगांत त्यांचा मोठा वापर होतो.

अवयव प्रत्यारोपण : प्राण्यांचे अवयव मानवी शरीरात बसवता येतील का, यावर सध्या मोठे संशोधन सुरू आहे.

माकडे येतात कुठून ?

चिनमध्ये सरकारी लायसेन घेऊन प्रायमेट ब्रिडींगचे फार्म आहेत. याठिकाणी अशा प्रयोगांना लागणाऱ्या माकडांची मोठ्या प्रमाणात पैदास केली जाते. ब्रिडर्सने आता या माकडांची पैदास कमी केली आहे त्‍यामुळे अनेक कंपन्याना माकडे मिळेना झाली आहेत. तसेच कंबोडीया व मॉरिशीअस मधूनही मोठ्या प्रमाणात माकडे चिनमध्ये आयात केली जातात पण रोगराई व तस्करींच्या प्रकारामुळे या ठिकाणाहून येणारी माकडे कमी झाली आहेत.

बायोटेक कंपन्यामध्ये प्रचंड गुंतवणूक वाढली

तसेच चिनमध्ये काही कंपन्यांनी आयपीओ आणले तर अनेक विदेशी गुंतवणूकदारांनी या क्षेत्रात गुंतवणूक केली आहे. परिणामी बायोटेक कंपन्या मोठ मोठे प्रोजेकट उभारत आहेत. रिसर्च आणि डेव्हलपमेंटमुळे अशा माकडांची मागणी प्रंचडच वाढू लागली आहे. पण तुटवड्यामुळ या क्षेत्रात आता थोडे चिंतेच वातावरण तयार झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news