

पुढारी ऑनलाईन डेस्क: चीनमधील रॉकी टेरीनच्या दक्षिण भागातील डोंगर रांगातील एक फोटो जगासमोर आला आहे. यामध्ये इंग्रजी लिपीतील एक्स ( X ) आकाराच्या एका इमारतीचे बांधकाम सुरु असल्याचे दिसत आहे; पण चीन एवढ्या गूढरित्या या इमारतीचे बांधकाम का करत आहे, याची उत्सूकता जगाला लागली आहे.
'सीएनएन'ने दिलेल्या वृत्तानुसार, चीनमध्ये बांधली जात असलेली ही इमारत अक्षय उर्जेसाठी उभारण्यात येत आहे. या इमारतीमध्ये प्रंचड आकाराचे न्युक्लिअर फ्युजन असणार आहेत. यातून भविष्यातील उर्जेची गरज भागवण्यासाठी अक्षय व प्रदूषणविरहीत उर्जा तयार करण्याचा मानस आहे. विश्लेषक डेकर एवलेथ यांच्या म्हणन्यानुसार, चीनमध्ये अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या आण्विक प्रयोगशाळा उभारलेल्या असू शकतात. २०२० पासून या देशाने न्युक्लिअर लोकशनमध्ये वाढ केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कोरोनाच्या महासाथीनंतर अशा प्रकारच्या इमारतीच्या बाधकामांनी वेग घेतला आहे. सध्या समोर आलेले बांधकाम हे ‘लेसर फ्यूजन’ असल्याचे मानले जाता आहे.
न्युक्लिअर उर्जा प्रक्रीयेत मोठ्या प्रमाणात प्रदूषणाचा धोका असतो. तर अनेक ठिकाणी अणुभट्टयांमध्ये काही अपघात झाल्यास रेडिऐशन पसरण्याचा धोका असतो. त्यामुळे अनेक अणूभट्टयांना जगभरात विरोध होत आहे. पण, लेसर फ्युजन प्रकीयेमध्ये याचा धोका कमी होऊ शकतो. या नवीन लेसर फ्यूजनच्या प्रक्रियेत अणूविभाजनाच्या प्रक्रियेतून उर्जा निर्माण होते. न्युक्लिअर फ्यूजनमुळे प्रदूषण विरहित तसेच कोणताही आण्विक कचरा न होता, विपूल प्रमाणात उर्जा तयार होऊ शकते. जगातील अनेक देश व कंपन्या अशा पद्धतीच्या उर्जानिर्मितीसाठी प्रयत्न करत आहेत.
या इमारतीमधील चार बाजूंना चार भव्य आकारच्या भूजा उभारल्या जात आहेत. आणि या चारी बाजूंमधून एकाचवेळी मध्यभागी असलेल्या टॉवरमधील केंद्रस्थानी मारा केला जाईल. यामध्ये हायड्रोजन असणार आहेत. लेसर ऊर्जा हायड्रोजनला एकत्र करून इग्निशन नावाच्या प्रक्रियेतून उर्जा निर्माण करेल. यासाठी अशी इमारत उभी केली असेल, असे डेकर एवलेथ यांनी म्हटले आहे.
अमेरिकेतील कॅलिफोर्नियाची नॅशनल इग्निशन फॅसिलीटी ही कंपनी ही लेसर इग्निशनटेक्नालॉजीसाठी प्रयत्न करत आहेत. २०२२ मध्ये या कंपनीच्या संशोधकांना न्युक्लिअर फ्युजन प्रक्रियेतून मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण करण्यात यश आले होते. पण चिन ही अमेरिकेपेक्षा एक पाऊल पुढे आहे. चिनने सुरु केलेला हा प्रकल्प सुर्याच्या पृष्ठभागवार होणारे स्फोट व त्याचा पृथ्वीवर होणार परिणाम याविषयात अधिक खोलात संशोधन करत आहेत. त्याचबरोबर सुर्याच्या पृष्ठभागावर होणाऱ्या स्फोटाप्रमाणे नियंत्रित पद्धतीने स्फोट करण्यात यश मिळाले तर मोठ्याप्रमाणत उर्जेचा स्त्रोत मानवाला उपलब्ध होऊ शकतो.
अमेरिकेच्या प्रकल्पापेक्षा चीनचा प्रकल्प ५० टक्क्यांनी मोठा आहे . त्याच्या आकाराचे फायदे आहेत कारण मोठ्या लेसरमुळे जास्त दाब मिळतो आणि अधिक पदार्थ संकुचित करता येतात, ज्यामुळे न्यूक्लियर फ्यूजन प्रयोगांमधून मिळणारी ऊर्जा वाढण्याची शक्यता असते. आणि हा प्रयोग यशस्वी झाला तर खूप मोठ्या लेसरसह देखील यशस्वी फ्यूजन प्रयोग साध्य करता येऊ शकतो.