

बीजिंग : चीनने गेल्या ८ वर्षांत भूतान सीमेलगत २२ गावे वसवली आहेत. उपग्रहीय छायाचित्रांतून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. भूतानच्या पश्चिम भागात डोकलाम सीमेलगत भारताला लागून यापैकी ८ गावे आहेत. ही सर्व ८ गावे २०२० नंतर वसविण्यात आली आहेत.
ही गावे ज्या ठिकाणांवर आहेत, त्या जागांवर चीन आपल्या वन चायना मोहिमेअंतर्गत नेहमीच दावा सांगत आलेला आहे. गावांना लागूनच चिनी सैन्याच्या चौक्या आहेत. जीऊ हे २२ गावांपैकी सर्वात मोठे गाव आहे. त्सेथंखखा या भूतानच्या मालकीच्या भागात ते वसलेले आहे. चीनने या गावांमध्ये लष्करातील अधिकारी, कर्मचारी मजूर, बॉर्डर पोलिस दलातील कर्मचाऱ्यांना वसविलेले आहे. ही सर्व गावे चीनच्या शहरांशी रस्त्यांच्या मागनि जोडलेली आहेत. भूतान मात्र याबाबत मूग गिळून गप्प आहे.
डोकलामवर ड्रॅगनचा डोळा
• २०१७ मध्ये लडाखलगतच्या डोकलामवरून भारत आणि चीनच्या सैन्यात ७३ दिवस संघर्ष चालला होता.
• चीनने इथे रस्त्याचे बांधकाम सुरू केले होते, त्याला भारताने विरोध केला होता. यानंतर चीनने इथे सैन्याची जमवाजमव केली होती. भारतानेही जशास तसे उत्तर दिले होते, नंतर वाद मिटला.
• आता पुन्हा गेल्या काही वर्षांपासून चीनने डोकलामला लागून असलेल्या भागांत आपल्या हालचाली वाढवल्या आहेत.
सिलिगुडी कॉरिडॉरच्या सुरक्षिततेला धोका शक्य
सिलिगुडी कॉरिडॉरची सुरक्षा १ या चिनी वसाहतींमुळे धोक्यात येऊ शकते. हा कॉरिडॉर ईशान्येकडील ७ राज्यांना भारताशी जोडतो. सिलिगुडी कॉरिडॉरमध्ये एके २ ठिकाणी भारत-तिबेट (चीन)- भूतानच्या सीमा परस्परांना मिळतात. २०१६ मध्येच चीनने भूतानच्या भागात गावे वसवायला सुरुवात केली होती. आधी एक गाव वसवले होते. त्यानंतर गेल्या ८ वर्षांत २२ ४ लहानमोठी गावे, २ हजार २८४ घरे निर्माण झाली आहेत. या घरांमध्ये सुमारे ७ हजार लोक राहतात.
आकडे बोलतात...
• 825 चौ. कि.मी. भूतानचे क्षेत्र चीनने बळकावलेले आहे.
• 2 टक्क्यांहून अधिकची जागा, (भूतान क्षेत्रफळाच्या तुलनेत)