पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नव्याने मोठ्या प्रमाणात आयात शुल्क (टॅरिफ्स) लागू करत जागतिक व्यापार धोरणात मोठे परिवर्तन घडवले आहे. तसेच अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर ( Tariff war) आणखी तीव्र झाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ९ एप्रिलपासून चीनवरील आयात शुल्क १०४ टक्के वाढवल्यानंतर, चीनने आता १० एप्रिलपासून अमेरिकेतून येणाऱ्या सर्व वस्तूंवर ३४ टक्क्यांऐवजी ८४ टक्के आयात शुल्क लावण्याची घोषणा केली आहे.
चीनने १२ अमेरिकन संस्थांना निर्यात नियंत्रण यादीत समाविष्ट केले आहे. तसेच, ६ कंपन्यांना त्यांच्या अविश्वासू यादीत टाकण्यात आले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर १०४% जास्त कर (टॅरिफ) लादला आहे. प्रत्युत्तरादाखल, अमेरिकेतून येणाऱ्या सर्व वस्तूंवर ३४ टक्क्यांऐवजी ८४ टक्के आयात शुल्क लावण्याची घोषणा केली आहे.या संघर्षामुळे जगात मंदीची भीती वाढली आहे. दरम्यान, युरोपियन युनियन (EU) आणि कॅनडा देखील ट्रम्पच्या टॅरिफला प्रत्युत्तर देण्याची तयारी करत आहेत.
अमेरिकेने केलेल्या टॅरिफमधील वाढनंतर कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. तेलाच्या किमती २०२१ नंतरच्या सर्वात कमी पातळीवर पोहोचल्या. कच्च्या तेलाच्या किमती सलग पाचव्या दिवशी घसरल्या आहेत. २०२१ नंतरच्या सर्वात कमी पातळीवर पोहोचल्या. ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल $६०.२२ आहे आणि WTI क्रूड (अमेरिकन तेल) ची किंमत प्रति बॅरल $५७.०४ आहे. किमती घसरण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे अमेरिका आणि चीनमधील वाढते टॅरिफ वॉर, मानले जात आहे.