Chernobyl disaster | सध्या का चर्चेत आली आहे मानवी इतिहासातील सर्वात विनाशकारी चर्नोबिलची घटना? का पुन्हा आहे जगाला रेडिएशनचा धोका?

गेल्या वर्षी १४ फेब्रुवारी २०२५ रोजी ड्रोन हल्ल्यात सुरक्षा चर्नोबिलच्या कवचाचे झाले होते नुकसान
chernobyl
chernobyl
Published on
Updated on
Summary
  • २६ एप्रिल १९८६ रोजी एक महास्फोट घडला जो आजही मानवासाठी धोकादायक

  • १४ फेब्रुवारी २०२५ झालेल्या हल्ल्यात चर्नोबिलच्या सुरक्षा कवचाला मोठे भगदाड

  • पुर्वी झालेली किरणोत्सर्गी धूळ आतमध्येच पसरलेली आहे.

  • रशियाच्या आणखी एका हल्ल्यामुळे आतील कवच कोसळू शकते

मानवी इतिहासातील सर्वात भयानक घटना म्हणजे चर्नोबिल अनुभट्टीतील स्फोट. २६ एप्रिल १९८६ रोजी तत्कालीन सोव्हिएत युनियनमध्ये असलेल्या 'चर्नोबिल न्यूक्लियर पॉवर प्लांट'मध्ये ही दुर्घटना घडली होती. सध्या हे ठिकाण युक्रेनमध्ये आहे. प्रिप्रियात शहरा जवळ असलेले या चर्नोबिल पॉवर प्लांटचे युनिट ४ मध्ये महाविस्फोट झाला होता. यामध्ये मोठ्या प्रमाणात किरणोत्‍सर्ग झाला होता. तसेच रेडिओॲक्टीव्ह पार्टीकल्स हवेत पसरले होते. युक्रेन, बेलारूस आणि रशियाचा मोठा भाग या दुषीत वातावरणाच्या प्रभावात आला होता.

हिरोशिमावर टाकलेल्या अनुबॉम्बपेक्षाही शतपटीने अधिक किरणोत्‍सर्ग

१९८६ अणुभट्टीच्या डिझाइनमधील त्रुटींमुळे युनिट ४ मधील रिॲक्टरचा दाब अनियंत्रित झाला. यामुळे प्रचंड स्फोट झाला व किरणोत्‍सर्ग झाला. याचे परिणाम आजही त्‍या भागातील लोक भोगत आहेत. हिरोशिमावर टाकलेल्या अणुबॉम्बपेक्षा शेकडो पटीने जास्त किरणोत्सर्ग येथे झाला होता संयुक्त राष्ट्रांच्या मते, किरणोत्सर्गामुळे होणाऱ्या कॅन्सरमुळे एकूण मृतांची संख्या ४,००० ते ९,००० पर्यंत असू शकते. 'ग्रीनपीस' आणि इतर काही संस्थांच्या मते, हा आकडा ९३,००० ते २,००,००० पेक्षा जास्त असू शकतो.

सध्या का चर्चेत आली आहे चर्नोबिल घटना
गेले 4 वर्षे झाले रशिया व युक्रेन यांच्यामध्ये युद्ध सुरु आहे यामध्ये दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ले चढवले आहेत. यामध्ये गेल्यावर्षी चर्नोबिलमध्ये ज्याठिकाणी स्फोट झाला होता त्‍याठिकाणी ड्रोन हल्ला झाला. १४ फेब्रुवारी २०२५ झालेल्या हल्ल्यात चर्नोबिलच्या सुरक्षा कवचाला मोठे छिद्र पडले आहे. त्‍यामुळे या ठिकाणाहून पून्हा मोठ्या प्रमाणात किरणोत्‍सर्ग होऊ शकतो अशी चिंता जाणकारांना वाटत आहे. हा हल्ला रशियानेच केला आहे असा आरोप युक्रेन केला होता तर रशियाने तो फेटाळल होता.

काय पुन्हा होऊ शकतो किरणोत्‍सर्ग ?

चर्नोबिलच्या दुर्घटना स्थळावर 2016 मध्ये एक अत्‍याधुनिक नवीन सुरक्षा कवच तयार केले आहे. (New Safe Confinement - NSC) या ड्रोन हल्ल्यामुळे NSC च्या घुमटाकार छताला साधारण ६ मीटर व्यासाचे (सुमारे १५ चौरस मीटर) मोठे छिद्र पडले. हा हल्ला जमिनीपासून सुमारे ८७ मीटर उंचीवर झाला होता. आता पुर्वी झालेली किरणोत्सर्गी धूळ आतमध्येच पसरलेली आहे. या कवचाला धोका निर्माण झाला तर हा किरणोत्‍सर्ग पून्हा होऊ शकतो.

दरम्यान ज्यावेळी दुर्घटना घडली त्‍यावेळी घाईघाईने सिमेंट आणि लोखंडाचे एक मोठे आवरण तयार करण्यात आले होते, ज्याला 'सार्कोफॅगस' (Sarcophagus) म्हणतात. हे आच्छादन तात्पुरते होते आणि त्याची मर्यादा ३० वर्षांची होती. या हल्याच्या माहितीनुसार, बाहेरील मुख्य नवीन आवरण (NSC) फुटलेले नाही. मात्र, या नवीन आवरणाच्या आत असलेले जुने १९८६ चे सिमेंटचे आवरण अत्यंत जीर्ण झाले असून ते कोसळण्याच्या स्थितीत आहे. जर ते आतल्या आत कोसळले, तर मोठ्या प्रमाणात किरणोत्सर्गी धूळ उडू शकते, जी या नवीन पोलादी कवचात अडकून पडेल. अशी भिती तज्ञ व्यक्त करत आहेत.

तसेच या प्रकल्पाचे , प्रकल्प संचालक सर्गी ताराकानोव्ह यांनी सांगितले की, तो निवारा पूर्णपणे पूर्ववत करण्यासाठी तीन ते चार वर्षे लागू शकतात आणि त्यांनी इशारा दिला की, रशियाच्या आणखी एका हल्ल्यामुळे आतील कवच कोसळू शकते.

काय आहे आंतरारराष्ट्रीय अणूउर्जा संस्थेचे मत

गेल्या महिन्यात संयुक्त राष्ट्रांच्या अणुऊर्जा देखरेख संस्थेने इशारा दिला आहे की, फेब्रुवारी 2025 मध्ये रशियन ड्रोन हल्ल्यात युक्रेनमधील संरक्षक कवच खराब झाले होते आणि ते आता किरणोत्सर्ग रोखण्याचे आपले प्राथमिक सुरक्षा कार्य करू शकत नाही.

International Atomic Energy Agency IAEA चे महासंचालक राफेल ग्रोसी यांनी AFP या वृत्तसंस्थेला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले की या कवचच्या दुरुस्तीचे काम आधीच करण्यात आले आहे, परंतु पुढील नुकसान रोखण्यासाठी आणि दीर्घकालीन अणुसुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सर्वसमावेशक उपाययोजना आवश्यक आहे," असे म्हटले आहे. तसेच ते पुढे म्हणाले की युक्रेनमधील बंद पडलेल्या चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्पातील अंतर्गत किरणोत्सर्ग निवारा रशियन हल्ल्यामुळे कोसळू शकतो,

हे कवच महाकाय आहे या कवचासाठी 45 देशांनी एकत्र येऊन 1.7 अब्ज डॉलर्स निधी गोळा केला होता. तसेच हे स्टॅचू ऑफ लिबर्टीपेक्षा उंच आहे तसे सिडनीच्या ऑपेरा हाऊसपेक्षाही मोठे आहे. याची उंची 120 मिटर तर लांबी 93 मिटर इतकी मोठी आहे. हे तयार करण्यापाठमागे एकच उद्देश आहे पुढील 100 वर्षे किरणोत्‍सारापासून जगाचे संरक्षण करणे.

यामुळेच पुन्हा किरणोत्‍सर्गाचा जगापुढे धोका

यामुळेच पुन्हा किरणोत्‍सर्गाचा जगापुढे धोका या सर्व घडामोडीमुळे चर्नोबिल चर्चेत आले असून प्रमुख सुरक्षा कवच सध्यातरी चांगले असले तरी आतिल पुर्वीचे सुरक्षा कवच कमकुवत झाले आहे. त्‍याठिकाणी अजूनही मोठ्या प्रमाणात गरम वाफ व किरणोत्‍सारी धूळ आहे. तसेच या युद्धात एखादे मोठे क्षेपणास्त्र किंवा ड्रोन थेट त्यावर आदळले, त्या परिसरात एक छोटा भूकंप होईल आणि जगाला किरणोत्‍साराच्या भयंकर संकटाला समोरे जावे लागेल अशी चिंता व्यक्त केली जात आहे.

डिस्ने हॉटस्टार या OTT वर असलेली चर्नोबिल या नावाची वेबसिरीज त्या काळातील भीषण परिस्थिती आपल्या डोळ्याससमोर उभी करते. ज्या रिॲक्टरमध्ये स्फोट झाला त्‍यावेळी काय काय घडले याचे ज्वलंत चित्रण यामध्ये आले आहे. तशीच काहीशी परिस्थिती पुन्हा याठिकाणी होऊ शकते अशी भिती तज्ञांना वाटते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news