

वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : पॅलेस्टाईनचा सशस्त्र गट हमास गाझा पट्टीतील नागरिकांवर तत्काळ हल्ला करण्याची योजना आखत असल्याच्या विश्वसनीय बातम्या अमेरिकेला मिळाल्या आहेत. हा हल्ला शस्त्रसंधीचे उल्लंघन ठरेल, असे अमेरिकेने स्पष्ट केले आहे.
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने एका निवेदनात म्हटले आहे की, ‘पॅलेस्टिनी नागरिकांवरील हा नियोजित हल्ला शस्त्रसंधी कराराचे थेट आणि गंभीर उल्लंघन ठरेल आणि मध्यस्थी प्रयत्नातून मिळालेल्या महत्त्वपूर्ण प्रगतीला धक्का देईल.’ हमासने हा हल्ला केल्यास गाझाच्या लोकांचे संरक्षण करण्यासाठी आणि शस्त्रसंधीची अखंडता राखण्यासाठी उपाययोजना केल्या जातील, असेही अमेरिकेने म्हटले आहे.
या उपाययोजना काय असतील, याबाबत निवेदनात स्पष्टता दिली नाही. मात्र, या आठवड्यात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला धमकावले होते. हमास आणि इस्रायलमध्ये गेल्या आठवड्यात शांतता करार झाला होता.