सेक्स रोबोटमुळे मानसिक स्‍वास्‍थ बिघडण्‍याचा धोका

Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क 

पाश्‍चात्‍य देशांसह अनेक देशांमध्‍ये  लैंगिक आनंदासाठी सेक्स रोबोटचा वापराचे  फॅड चांगलेच रुजत आहे. त्‍याची उपलब्धताही सोप्पी झालीय. मात्र त्‍याचा वापर हा व्‍यक़्‍तीबरोबरच समाजासाठीही घातक असल्‍याचे मत मानसशास्‍त्राचे अभ्‍यासक व्‍यक़्‍त करीत आहेत. 

मागील काही वर्षात सेक्स रोबोटची दुनिया कमालीची विस्‍तारत चालली आहे. आपल्याला हवी असलेली व्यक्तीचा मुखवटा  रोबोटला बसविण्‍या इतपत तंत्रज्ञानाने प्रगती साधली आहे. हुबेहुब सजीव व्‍यक्‍ती असावी, असाही सेक्‍स रोबोट बाजारात मिळू लागला आहे. हे शक्य झाले कृत्रिम प्रज्ञेमुळे. मात्र या कृत्रिम प्रज्ञा असलेल्‍या रोबोटचा वापर करणार्‍या  व्‍यक़्‍तीचे मानसिक स्‍वास्‍थ पूर्णपणे  बिघडविणारे ठरण्‍याचा धोका आहेच. त्‍याचबरोबार समाजाचाही मानसिक आरोग्‍यासाठी ही धोक़्‍याची घंटा आहे. 

रिअल रोबोटिक्स या कम्पनीकडून ऑनलाईन जाहिरातीत दाखवण्यात आलेले रोबो ८००० ते १०००० डॉलर आहे. हि रोबोट सेक्स डॉल आपला मान आणि गळा हलवते.तसेच डोळेही मिचमिचते.ती काही वाक्य बोलूही शकते. मात्र कितीही झाले तरी ते यंत्रच. त्‍यामुळे तिच्‍यात भावनिक ओलावा,असण्‍याचे कारणच नाही. त्‍यामुळेच सेक्स रोबोटचा वापर करणारी व्‍यक़्‍ती आपले मानसिक स्‍वास्‍थ हरवतो. याचा वापर करणार्‍यांची प्रेम हि भावना विसरून जाईल.  त्‍याचा प्रवास यांत्रिक होण्याकडे सुरु होईल, अशी चिंताही मानसशास्‍त्राचे अभ्‍यासक व्‍यक़्‍त करीत आहेत. 

आपल्या गर्लफ्रेंडशी आपली भावनिक जवळीक असते, त्या स्पर्शात मायेचा ओलावा असतो, मात्र या यांत्रिक रोबोटमध्ये मानवी भावनांचा लवलेश नसतो. या रोबोटमुळे पुरुष महिलांकडे केवळ भोगवस्‍तू म्‍हणून पाहतील,अशी चिंताही तज्ञांना भेडसावत आहे. म्हणून याला विरोध करण्यासाठी  The campaign against sex robots ही चळवळ जोर  धरू लागली आहे. सध्‍या तरी त्‍यांना मिळणारा प्रतिसाद फार समाधानकारक नाही. त्‍यामुळे आता व्‍यक़्‍ती आणि समाजाचे मानसिक स्‍वास्‍थ बिघडविणार्‍या सेक़्‍स रोबोटला कसा विरोध होणार, हे पाहणे महत्त्‍वाचे ठरणार आहे. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news